Advertisements
Advertisements
Question
व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
Solution
मासेमारी हा एक प्रमुख प्राथमिक व्यवसाय असून जगभरातील सर्व देशांमध्ये हा व्यवसाय केला जातो.
मासेमारी व्यवसायावर विविध प्राकृतिक आणि मानवी घटक प्रभाव पाडतात, त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे
(अ) मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक:
मासेमारी हा जगात सर्वत्र केला जाणारा एक महत्त्वाचा प्राथमिक व्यवसाय आहे. जगातील बहुतांशी सर्व देश या व्यवसायात कार्यरत असून हा व्यवसाय प्रमुखाने किनारपट्टीच्या प्रदेशात केला जातो. पॅसिफिक महासागराची पश्चिम, वायव्य, ईशान्य व पूर्व किनारपट्टी तसेच अटलांटिक महासागराची वायव्य व ईशान्य किनारपट्टी हे प्रदेश मासेमारीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत.
मासेमारी व्यवसायावर भूखंड मंचाची उपलब्धता हा सर्वांत महत्त्वाचा घटक प्रभाव पाडतो. येथे समुद्राची खोली कमी असते, सूर्यकिरणे थेट तळापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे प्लवंग या माशांच्या खाद्याची निर्मिती भरपूर प्रमाणात होते. त्यामुळेच एकूण माशांची पैदास येथे जास्त प्रमाणात होते. याशिवाय उष्ण आणि शीत सागरी प्रवाहांचे संगमस्थान हादेखील महत्त्वाचा घटक मासेमारी व्यवसायावर प्रभाव पाडतो. ज्या ठिकाणी असे दोन प्रवाह एकत्र येतात, तेथे प्लवंगांची निर्मिती व माशांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. मासेमारीवर तिसरा प्रमुख प्रभाव पाडणारा प्रकृती घटक म्हणजे दंतुर किनारे आणि नैसर्गिक बंदरे होत. ज्या देशांना किंवा किनारपट्टीच्या प्रदेशांना दंतुर किनारा लाभला आहे, तेथे अनेक नैसर्गिक बंधाऱ्यांची निर्मिती झाली आहे. उदा., युरोपमधील बहुतांश देश, अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील न्यू फाऊंडलँड बेटाजवळील प्रदेश, जपान, फिलिपिन्स इत्यादी वनांची उपलब्धता हा नैसर्गिक घटकही मासेमारी व्यवसायावर अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पाडतो. ज्या प्रदेशात अशी विपु वनसंपदा उपलब्ध आहे तेथे जहाजबांधणी व्यवसायास बळ मिळते आणि त्यामुळे अशा प्रदेशात अप्रत्यक्षरीत्या मासेमारी व्यवसायास प्रोत्साहन मिळते. देशाचे सापेक्ष स्थान हा अजून एक अन्य प्राकृतिक घटक मासेमारी व्यवसायावर प्रभाव पाडतो. ज्या देशांना द्विपीय स्थान किंवा बेटांचे स्थान उपलब्ध आहे अशा देशांना मासेमारीस मुबलक वाव मिळतो. असाच वाव काही प्रमाणात द्वीपकल्पीय देशांनाही मिळतो. मात्र खंडांतर्गत देशांना किंवा केवळ उष्णकटिबंधीय सागर किनारे उपलब्ध असणाऱ्या देशांना मासेमारीचा व्यवसाय विकसित करण्यात अडथळे येतात.
(ब) मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे मानवी घटक:
मासेमारी व्यवसायावर विविध प्राकृतिक घटक प्रभाव पाडत असले, तरी अनेक मानवी घटकांचा प्रभावही मासेमारी व्यवसायावर पडतो. जगातील अनेक देशात खूप पूर्वीपासून किंवा प्राचीन काळापासून मासेमारी केली जात असल्यामुळे मासेमारी ही त्या देशांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग ठरला आहे. अशा देशात दर्यावर्दी लोकांची मनुष्यबळाची निर्मिती सहज उपलब्ध होते. चीन, जपान, उत्तर अमेरिका, चिली, पेरू, फिलिपिन्स या देशातील लोक, तसेच अनेक युरोपीय देशातील लोक उत्तम दर्यावर्दी लोक म्हणून ओळखले जातात. या देशांचा साहजिकच मासेमारी व्यवसायात कल असतो. साहजिकच हे देश मासेमारी व्यवसायात अग्रेसर असतात. मासेमारी व्यवसायांवर आधुनिक तंत्रज्ञान, भांडवलाची उपलब्धता हे घटकही खूप प्रभाव पाडतात. जगातील बहुतांशी विकसित देशात अत्याधुनिक दळणवळणाची साधने, आधुनिक विशाल नौका आणि यांत्रिक बोटी, माशांच्या प्रजातींची माहिती मिळवणारे व त्यांचा मागोवा घेणारी भौगोलिक माहिती तंत्रज्ञान आणि उपग्रह तंत्रज्ञान यांचा वापर करूनही मासेमारी केली जाते.
थोडक्यात, मासेमारी व्यवसायावर प्राकृतिक व मानवी अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती
मासेमारी व प्राकृतिक घटक.
फरक सांगा.
खाणकाम आणि मासेमारी.
जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवून सूची तयार करा.
१) डॉगर बँक मत्स्यक्षेत्र
२) आशिया खंडातील वनकटाईचे क्षेत्र
३) ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र
४) युरोपमधील शेतीखालील क्षेत्र
५) अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र
६) नैऋत्य अटलांटिकमधील मासेमारी क्षेत्र