Advertisements
Advertisements
Question
'या बालांनो या रे या' हे गीत मिळवा व परिपाठात सादर करा.
Short Answer
Solution
या बालांनो, या रे या!
या बालांनो, या रे या! लवकर भरभर सारे या! मजा करा रे, मजा करा! आज दिवस तुमचा समजा.
स्वस्थ बसे, तोचि फसे; नवभूमी दाविन मी, या नगराला लागुनिया सुंदर ती दुसरी दुनिया.
खळखळ मंजुळ गाति झरे, गीत मधुर चहुंबाजु भरे; जिकडे तिकडे फुलें फळें, सुवास पसरे, रसहि गळे.
पर ज्यांचे सोन्याचे ते रावे, हेरावे; तर मग कामे टाकुनिया नवी बघा या ही दुनिया!
पंख पाचुचे मोरांना, टिपति पाखरें मोत्यांना; पंख फडकती घोड्यांना, मौज दिसे ही थोड्यांना.
चपलगती हरिण किती! देखावे, देखावे; तर मग लवकर धावुनिया नवी बघा या ही दुनिया!
या बालांनो, या रे या! लवकर भरभर सारे या!
shaalaa.com
Is there an error in this question or solution?