Advertisements
Advertisements
प्रश्न
2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.
उत्तर
कच्ची आकृती
विश्लेषण:
रेख OM ⊥ रेषा l ......[स्पर्शिका त्रिज्येला लंब असते.]
रेख OM ला बिंदू M वर लंब असणारी रेषा ही M बिंदूतून जाणारी वर्तुळाची अपेक्षित स्पर्शिका आहे.
रचनेच्या पायऱ्या:
i. केंद्र O असलेले 2.7 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.
ii. त्यावर कोणताही एक बिंदू M घ्या आणि किरण OM काढा.
iii. बिंदू M मधून किरण OM ला लंब असलेली रेषा l काढा.
रेषा l ही वर्तुळाची बिंदू M मधून जाणारी अपेक्षित स्पर्शिका आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा.
O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. |
↓ |
वर्तुळावर कोणताही एक बिंदू P घ्या. |
↓ |
किरण OP काढा. |
↓ |
किरण OP ला P मधून लंब रेषा काढा. |
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर बिंदू A व B घेऊन व्यास AB काढा. |
↓ |
किरण OA काढा. किरण OB काढा. |
↓ |
किरण OA ला बिंदू A मधून लंब रेषा काढा. |
↓ |
किरण OB ला बिंदू B मधून लंब रेषा |
P केंद्र असलेले वर्तुळ काढा. कंस AB हा 100° काढा. A व B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालील कृती करा.
कोणतीही त्रिज्या व P केंद्र घेऊन वर्तुळ काढा. |
↓ |
वर्तुळावर कोणताही एक बिंदू A घ्या. |
↓ |
किरण PB असा काढा की ∠APB = 100° |
↓ |
किरण PA ला A मधून लंब रेषा काढा. |
↓ |
किरण PB ला B मधून लंब रेषा काढा. |
4 सेमी व 6 सेमी त्रिज्या असलेली व O केंद्र असलेली समकेंद्री वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकाखंडांची लांबी लिहा.
C केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील P बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या स्पर्शिकांमधील कोन 60° असेल.
बिंदू P हा रेषा AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. बिंदू P मधून जाणारे 4 सेमी त्रिज्येचे असे वर्तुळ काढा, की रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.