Advertisements
Advertisements
प्रश्न
एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांतून 1 विद्यार्थी निवडला, तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.
उत्तर
शाळेतील एकूण विद्यार्थी = 200
∴ n(S) = 200
कबड्डी हा खेळ आवडणारे विद्यार्थी = 135
∴ कबड्डी हा खेळ न आवडणारे विद्यार्थी = 200 – 135 = 65
समजा,
घटना A: निवडलेल्या विद्यार्थ्याला कबड्डी हा खेळ आवडत नसल्याची आहे.
∴ n(A) = 65
∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S")) = 65/200`
∴ P(A) = `13/40`
∴ त्या एका विद्यार्थ्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता `13/40` आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे.
एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता _____ असते.
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
गोलरक्षक हा संघनायक असणे.
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.
फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
मिळालेला फुगा लाल असणे.
फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
मिळालेला फुगा निळा असणे.
एका फाशाची सहा पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत.
हा फासा एकदाच टाकला, तर पुढील घटनाची संभाव्यता काढा.
वरच्या पृष्ठभागावर ‘D’ मिळणे.
एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
तिकिटावरील संख्या विषम असणे.
एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे
एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्याची कृती पूर्ण करून लिहा.
कृती:
एक फासा टाकला असता नमुना अवकाश 'S' आहे.
S = `{square}`
∴ n(S) = 6
घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.
A = `{square}`
∴ n(A) = 3
∴ P(A) = `square/("n"("S"))` ............(सूत्र)
∴ P(A) = `square`