Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे (mathematics) या शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आणि ती कार्डे पालथी ठेवली. त्यांतून एक अक्षर उचलल्यास ते अक्षर ‘m’ असण्याची संभाव्यता काढा.
उत्तर
नमुना अवकाश
S = {m, a, t, h, e, m, a, t, i, c, s}
∴ n(S) = 11
समजा,
घटना A: कार्डावरील अक्षर ‘स्’ असणे. स् अक्षर असलेली 2 कार्डे आहेत.
∴ A = {m, m}
∴ n(A) = 2
∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`
∴ P(A) = `2/11`
∴ कार्डांतून एक अक्षर उचलल्यास ते अक्षर ‘m’ असल्याची संभाव्यता `2/11` आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर पुढील घटनांची संभाव्यता काढा.
i) मिळालेला फुगा लाल असणे.
ii) मिळालेला फुगा निळा असणे.
दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे.
दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे.
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या 5 च्या पटीत असेल.
1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता _____ असेल.
जर n(A) = 2, P(A) = `1/5`, तर n(S) = ?
बास्केटबॉल खेळाडू जॉन, वासिम व आकाश एका ठरावीक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता `4/5`, वसीमची 0.83 व आकाशची 58% आहे, तर कोणाची संभाव्यता सर्वांत जास्त आहे?
जोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवली आहेत. त्यांतून अक्षराचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे, तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा.
एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा.
एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा:
घटना B: काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे.