Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा.
उत्तर
सुरूवातीची पूर्वावस्था-
नंतरची पूर्वावस्था-
मध्यावस्था-
पश्चावस्था-
अंत्यावस्था-
सूत्री विभाजनाचे दोन टप्पे असतात:
(अ) प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन आणि
(ब) परिकलविभाजन किंवा जीवद्रव्य विभाजन.
प्रकलविभाजन पुढील चार पायऱ्यांमध्ये पूर्ण होते: पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था व अंत्यावस्था.
- प्रकलविभाजन-
- पूर्वावस्था: गुणसूत्र के वलीभवन सुरू होते. मुळात गुणसूत्र नाजूक धाग्यासारखे असतात. परंतु ते आता आखूड व जाड होतात. त्यांच्या अर्धगुणसूत्र जोड्या तयार होऊन त्या सहज दिसू लागतात. ताराकेंद्र द्विगुणित होऊन ते पेशीच्या विरुद्ध धृवाकडे जाते. केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते.
- मध्यावस्था: सर्व गुणसूत्रांचे वलीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसते. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही ताराकेंद्रे आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू यादरम्यान विशिष्ट अशा लवचीक प्रथिनांचे धागे किंवा तुर्कतंतू तयार होतात. केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते.
- पश्चावस्था: तुर्क तंतुच्या मदतीने गुणसूत्रबिंदूंचे विभाजन होते. प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्यगुणसूत्रांना म्हणतात. गुणसूत्रे केळीच्या घडा प्रमाणे दिसतात. या पायरीच्या शेवटाला गुणसूत्रांचे दोन-दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचतात.
- अंत्यावस्था: पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडत जाऊन पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. एका पेशीमध्ये आता दोन जन्यकेंद्रके तयार होतात. जन्यकेंद्रकांमध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. अशा तऱ्हेन प्रकलविभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकलविभाजन सुरू होते. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचांभोवती केंद्रकावरण तयार होते.
- परिकलविभाजन: प्राणी पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते. पेशीद्रव्याचे विभाजन होऊन आता दोन नवीन जन्यपेशी तयार होतात. वनस्पती पेशीत काच तयार न होता पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल तयार होऊन परिकलविभाजनाने दोन नव्या जन्यपेशी तयार होतात.
-
सूत्री विभाजनाचे फायदे:
- कायपेशी आणि मूलपेशी चे विभाजन.
- शरीराच्या वाढीसाठी आवश्यक.
- शरीराची झालेली झीज भरून काढणे, जखमा बऱ्या करणे, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करणे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेतील _______ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
सूत्री विभाजनाच्या ______ अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.
फरक स्पष्ट करा.
सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन
शास्त्रीय कारण लिहा.
पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.
अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.
सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी __________ आहेत.
प्रकल विभाजनाची पहिली अवस्था म्हणजे _________ होय.
खालीलपैकी ___________ सूत्री विभाजनाचा भाग नाही.
आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून __________ ऊर्जा मिळते.