Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन
उत्तर
सूत्री पेशीविभाजन | अर्धगुणसूत्री पेशीविभाजन |
1. सूत्री पेशी विभाजन गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. द्विगुणित पेशी द्विगुणितच राहतात. | 1. अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. द्विगुणित पेशी एकगुणित होतात. |
2. एका जनक पेशीपासून दोन जन्य पेशी निर्माण होतात. | 2. एका जनक पेशीपासून चार जन्य पेशी निर्माण होतात. |
3. सूत्री पेशीविभाजनाच्या केंद्रक विभाजनात पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण चार पायऱ्या असतात. | 3. अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात भाग I आणि भाग - II अशा दोन प्रमुख पायऱ्या असतात. प्रत्येक भागाच्या पुन्हा पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण चार पायऱ्या असतात. |
4. सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते. | 4. अर्धगुणसूत्री पेशीविभाजन पूर्वावस्था जास्त काळाची असते. |
5. सूत्री पेशीविभाजनात सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होत नाही. | 5. अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होते. |
6. या प्रकारचे पेशीविभाजन वाढ आणि विकास यांसाठी आवश्यक असते. | 6. या प्रकारचे पेशीविभाजन युग्मके तयार करण्यासाठी आवश्यक असते. |
7. सूत्री विभाजन काय पेशी आणि मूल पेशी अशा दोन्हींत होते. | 7. अर्धगुणसूत्री विभाजन काय पेशीत होत नाही; केवळ मूल पेशीतच होते. |
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेतील _______ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
सूत्री विभाजनाच्या ______ अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.
शास्त्रीय कारण लिहा.
पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.
आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा.
अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.
सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी __________ आहेत.
प्रकल विभाजनाची पहिली अवस्था म्हणजे _________ होय.
खालीलपैकी ___________ सूत्री विभाजनाचा भाग नाही.
आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून __________ ऊर्जा मिळते.