Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.
ऑक्सिजन चक्र
संक्षेप में उत्तर
उत्तर
जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय.
ऑक्सिजन चक्रातील महत्वाच्या प्रक्रिया:
- वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती आणि वापर सतत होत असतो. ऑक्सिजन चक्रात जैविक व अजैविक अशा दोन्ही घटकांचा समावेश असतो.
- प्रकाशसंश्लेषणादरम्यान (जैविक क्रिया) वनस्पती कार्बन डायऑक्साइइडचा वापर करतात आणि ऑक्सिजन वायू वातावरणात मुक्त करतात. वातावरणातील या ऑक्सिजनचा वापर प्राणी श्वसनासाठी करतात आणि कार्बन डायऑक्साइड वातावरणात मुक्त करतात.
- मुक्त झालेल्या कार्बन डायऑक्साइडचा पुनर्वापर वनस्पती प्रकाशसंश्लेषणासाठी करतात.
- प्रकाशसंश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो.
- ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो.
- ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो. रेण्वीय ऑक्सिजन (O2), पाणी (H2O), कार्बन डायऑक्साईड (CO2) व असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते.
ऑक्सिजन चक्र
shaalaa.com
ऑक्सिजन चक्र
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?