Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.
नायट्रोजन चक्र
संक्षेप में उत्तर
उत्तर
निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगांत घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण ‘नायट्रोजन चक्र’ म्हणून ओळखले जाते.
नायट्रोजन चक्रातील महत्वाच्या प्रक्रिया:
- नायट्रोजनचा स्त्रोत: हवेतील रेण्वीय स्वरूपातील नायट्रोजन वनस्पतींना घेता येत नाही. वनस्पती जमिनीतील वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजनचे क्षार वापरतात. म्हणजे वनस्पतींसाठी जमिनीतील क्षार स्वरूपातील नायट्रोजन हा नायट्रोजनचा मुख्य आणि एकमेव स्त्रोत आहे.
- नायट्रोजनचे स्थिरीकरण: हवेतील रेण्वीय नायट्रोजनचे त्यांच्या क्षारांच्या स्वरूपात रूपांतर होण्याच्या क्रियेला नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतात. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइट मध्ये होणे.
- अमोनीकरण: सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिआ मुक्त होणे.
- नायट्रीकरण: अमोनिआचे नाइट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होणे.
- विनायट्रीकरण: नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे.
नायट्राेजन चक्र
shaalaa.com
नायट्राेजन चक्र
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?