Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.
कार्बन चक्र
संक्षेप में उत्तर
उत्तर
कार्बन चक्र
कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय.
कार्बन चक्रातील महत्वाच्या प्रक्रिया:
- अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यत: प्रकाशसंश्लेषण व श्वसनक्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे CO2 चे कर्बोदकात रूपांतर करतात, तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात.
\[\ce{6CO2 + 12H2O ->[{सूर्यप्रकाश}][{हरितद्रव्य}] C6H12O6 + 6H2O + 6O2↑}\] - शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात.
- म्हणजेच वनस्पतींकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे, शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षक प्राण्यांकडे संक्रमित होतो. शाकाहारी, मांसाहारी आणि सर्वोच्च भक्षकांकडून श्वसनाद्वारे पुन्हा कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला जातो.
\[\ce{C6H12O6 + 6O2 ->[{तंतूकणिका}] 6 CO2↑ + 6 H2O + {ऊर्जा}}\] - शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यांसारख्या विघटकांकडून अपघटन होऊन CO2 वायू पुन्हा मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो व पुन्हा वापरला जातो.
- जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वणवे आणि ज्वालामुखी उद्रेक यांसारख्या अजैविक प्रक्रियांमुळे CO2 वायू बाहेर पडून हवेत मिसळतो.
- अशाप्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते.
shaalaa.com
कार्बन चक्र
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?