Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो.
संक्षेप में उत्तर
उत्तर
- सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषकद्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते.
- अन्नसाखळीचे उदाहरण देऊन पोषकद्रव्यांचा चक्रीय प्रवाह स्पष्ट करता येईल. उत्पादकांनी (हरित वनस्पतींनी) तयार केलेले अन्न भक्षकांकडून खाल्ले जाते व पोषकद्रव्ये मिळवली जातात.
- ही पोषकद्रव्ये अन्नसाखळीच्या विविध पातळींतून संक्रमित केली जातात. सजीवांच्या मृत्यूनंतर विघटक त्यांच्या मृत शरीरांकडून आपले अन्न मिळवतात व त्यांचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थांच्या स्वरूपात करतात. हे पदार्थ हवा, पाणी व मृदेत मिसळले जातात. वनस्पतींकडून या पोषकद्रव्यांचे पुनर्शोषण होते आणि ही पोषकद्रव्ये अन्नसाखळीत संक्रमित होतात.
- शीलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमांतून हे चक्र अविरत चालू असते.
- अशाप्रकारे, सजीवांच्या वाढीस आणि विकासास आवश्यक असणाऱ्या पोषकद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो.
shaalaa.com
जैव-भू-रासायनिक चक्र
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा.
जैव-भू-रासायनिक चक्र | जैविक प्रक्रिया | अजैविक प्रक्रिया |
1. कार्बन चक्र | ||
2. ऑक्सिजन चक्र | ||
3. नायट्रोजन चक्र |
कारणे लिहा.
विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे.
खालील प्रश्नाचे उत्तर सोदाहरण स्पष्ट करा.
परिसंस्थेमधील ऊर्जाप्रवाह आणि पोषकद्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो? का?
विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल?
जैव-भू-रासायनिक चक्र व त्याचे प्रकार सांगून महत्त्व स्पष्ट करा.
खालील चुकीचे विधान दुरूस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा.
पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो.