Advertisements
Advertisements
प्रश्न
आपल्या महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे दर बारा कोसांवर बोलीभाषा बदलते. महाराष्ट्रामध्ये विविध बोलीभाषा बोलल्या जातात. अशा बोलीभाषांची आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा. कोणत्या भागात कोणती बोली बोलली जाते, त्याची नोंद करा.
उत्तर
भारत देशात मराठी बोलणारी माणसे भारताच्या जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत. जगातील बहुतेक प्रमुख भाषाप्रमाणेच, मराठी भाषा ही एकाहून अधिक पद्धतीने बोलली जाते. मुख्य भाषेची नाते कायम ठेवलेली ही भाषा दर बारा कोसांगणिक उच्चारात, शब्दसंग्रहात, आघातात व वाक्प्रचारांत बदलत राहते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो.
पिढ्यान् पिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा स्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्यामुळे 'मी मराठी बोलतो' असे विधान केले तर कुठली मराठी बोलता असा प्रश्न आपोआप उपस्थित होतो. कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण एकच असले तरी स्थानमहात्म्यानुसार मराठी बोलीचे कोकणी मराठी हीतही पाच दहा प्रकार आहेत. कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी असे अनेक प्रकार कानावर पडत भौगोलिक परिसरानुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलानी, नंदुरबारी, खाल्यांगी, वर्ल्यांगी, डोंगरांगी जामनेर, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकारात होतात.
आदिवासी पोटभाषा:
महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया, आदि बोलीभाषा प्रमुख आहेत. या पोटभाषा महत्त्वाच्या असल्या तरी यापैकी गोंडी व भिल्ली ह्या पोटभाषा अतिप्राचीन आहेत. गोंडी पोटभाषा महाराष्ट्रात प्राधान्याने आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्ट्यात बोलली जाते. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात व आंध्र प्रदेशाच्या सीमेलगतचा ही गोंडी बोलली जाते. महाराष्ट्रातील आदिवासी बोलींमध्ये गोंडी बोली सर्वाधिक बोलली जाते. गोंडी बोलीला लिपी असल्याचे पुरावेही अलीकडचे काही संशोधक देत आहेत.
गोंडी बोलीभाषेचा बारकाईने अभ्यास करणारा जर्मन भाषातज्ञ जुल ब्लॉच यांनी गोंडी बोलीची आंतरराष्ट्रीयता शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता. द्रावडी भाषा समुहातील भाषेची अभिन्न वैशिष्ट्ये धारण करणारी गोंडी ही एकमेव व प्राचीन भाषा आहे असे मत कॉल्डवेलने गोंडी भाषेच्या सात वय्याकरणीय कसोट्या लावून मांडले होते. भिल्ली भाषा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये बोलली जाते. या पोट भाषेवर त्या राज्यांच्या प्रमाण भाषेचा प्रभाव असल्याने महाराष्ट्रात ती मराठीची पोटभाषा म्हणून गणली जाते.