Advertisements
Advertisements
प्रश्न
आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल?
टिप्पणी लिखिए
उत्तर
आपला परिसर कसा आहे, हे विचारात घेऊन त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायला हवा. त्या दृष्टीने पुढील बाबी करायला हव्यात –
- परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे जतन केली पाहिजेत. त्यांची माहिती फलकावर लावणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे या बाबी विचारात घ्याव्यात. समुद्रकिनारे स्वच्छ करून पर्यटन वाढवता येईल.
- गांडूळ प्रकल्प, शून्य कचरा प्रकल्प, सोलर वीज प्रकल्प, जैविक शेती असे विविध प्रकल्प राबवल्यास ते पाहण्यासाठी पर्यटक येतील.
- परिसरातील कला, संस्कृती, हस्तोदयोग, कुटीरोदयोग यांना चालना दिल्यास हे उदयोग पाहण्यासाठी, खरेदीसाठी पर्यटक येतील.
आपल्या परिसराचा औद्योगिक, भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास केल्यास पर्यटन निश्चितच वाढेल, असे मला वाटते.
shaalaa.com
पर्यटनाचा विकास
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?