Advertisements
Advertisements
प्रश्न
पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
टिप्पणी लिखिए
उत्तर
आधुनिक काळात पर्यटन ही रोजगाराभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे
- पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे.
- पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासव्यवस्था, प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत.
- पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहितीपुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, दुभाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. दिव्यांगांच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
shaalaa.com
पर्यटनाचा विकास
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?