Advertisements
Advertisements
प्रश्न
अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
लघु उत्तरीय
उत्तर
ऐषारामात राहता येणे शक्य असूनही अण्णा भाऊ साठे झोपडपट्टीत राहत. त्यांची झोपडी गळकी होती. झोपडीतच डबकी होती. मोडकी खुर्ची, मोडके टेबल, एवढेच फर्निचर त्यांच्या झोपडीत होते. एक तांब्या, जर्मनचे एक ताट, एकच डेचकी एवढीच घरात भांडी होती. एक लेंगा एक सदरा एवढेच कपडे. चुलीत लाकडे होती, पण तीही अर्धी जाळलेली. कोणी पाहुणा आल्यास तिथल्या तिथे वावरताना घालण्यासाठी त्यांच्याकडे एक बनियान होते. अण्णा महान लेखक होते. त्यांच्या कथा, कादंबऱ्या गाजत होत्या. ते सतत लिहित असेलेले दिसत. लिहिताना लागणारा चष्माही मोडका होता. असे अण्णांचे राहणीमान होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?