Advertisements
Advertisements
प्रश्न
अण्णा भाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
अण्णाभाऊ साठे हे स्वतः जगप्रसिद्ध साहित्यकार होते. अण्णा दीनदुबळ्यांच्या दुःखाचे वास्तव मांडणारे साहित्य निर्माण करत असत. त्यांना विठ्ठल उमप यांची गाणी फार आवडत असत. अण्णांनी विठ्ठल उमप यांच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या होत्या. त्यांचा बुलंद पहाडी आवाज अण्णांना मोहून टाकायचा. त्यांच्या वागणुकीची वर्तनाची इतरांकडून माहितीही अण्णांना मिळाली होती. त्यानी विठ्ठल उमप यांच्या आवाजातील गोडवा अनेकदा चाखला होता. विठठ्ठल उमप यांच्या रूपाने एक क्रांतिकारक कलावंत उदयास येत आहे असे अण्णांना वाटत होते. विठ्ठल उमप यांना केव्हा भेटेन असं अण्णांना झालं होतं. अशावेळी विठ्ठल उमप यांची भेट झाली तो दिवस अण्णाभाऊंना सुदिन उगवला असे वाटले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?