Advertisements
Advertisements
प्रश्न
अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.
उत्तर
अनु व सुनिताचं नर्स आणि रुग्णाचं नातं होतं. नर्स म्हणून अनु पाच वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. महिन्या दीड महिन्यापूर्वीची कथा आहे. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझी ड्युटी होती. तिथं मला खरं तर उभं राहवत नाही; पण ड्युटी आली, की टाळता येत नाही. एके दिवशी सकाळी एक आठनऊ वर्षांची मुलगी ॲडमिट झाली होती. तिची आशा सगळ्यांनी सोडलेली होती. मुलीबरोबर तिची आई, मावशी आणि बिल्डींगमधल्या दहा-बारा बायकांचा घोळका होता. त्या सगळ्यांना मी बाहेरच्या बाहेर थोपवलं. मग भराभरा आमच्या हालचाली सुरू झाल्या. पायाला, हाताला नळ्या लागल्या. ब्लड ट्रॅन्स्फ्यूजन, सलायन-याशिवाय ऑक्सिजनपण लावलं. हे सगळं अर्थात नातेवाईकांच्या समाधानासाठी आणि नशिबाचा एक टक्का असतो त्याच्यासाठी. पोरगी नक्षत्रासारखी होती. तिच्यासाठी माझीही एकीकडे प्रार्थना चालली होती. ती पोरगी मधूनमधून डोळे उघडायची आणि क्षीण आवाजात सांगायची, ह्या नळ्या काढा. दिवसभर हे चाललं होतं. तिच्या यातना बघवत नव्हत्या. ह्या नळ्या काढा, म्हणून तिचा जप चालला होता. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. ते म्हणाले, ‘फार तर तीन चार तास काढेल.’ मग मी विचारलं, ‘असंच जर असेल, तर शेवटचे काही तास तिला सुखानं तरी जगू दे ना. तिच्या नळ्या काढते मी सगळ्या.’ डॉक्टर म्हणाले, ‘फक्त ऑक्सिजनची ठेवा.’ मी एकेक नळी काढून टाकली. तिनं डोळे उघडले. क्षीण पण लहान आवाजात ती म्हणाली, ‘ताई थँक्यू.’ मी तिला म्हणाले, ‘बेटा लवकर बरं व्हायचं. ही एवढी नळी मात्र काढायची नाही हं. मी उद्या भेटेन. तुझ्यासाठी गंमत आणीन.’ तिनं मान हलवली. दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर गेले ती गोड पोरगी आदल्याच दिवशी गेली होती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अनूने घर सोडले; कारण ______________
‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अनु म्हणाली. कारण ______________
अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण ______________
खालील नातेसंबंध लिहा.
अनु आणि आबा ___________
खालील नातेसंबंध लिहा.
भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर ___________
खालील नातेसंबंध लिहा.
अनू आणि सुनीता ___________
कृती करा.
अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी
कृती करा.
आबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये
नुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यांतील फरक स्पष्ट करा.
डॉक्टरचा पेशा |
नर्सचा पेशा |
घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष.
‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.
कथेच्या 'शोध' या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
'कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध' तुमच्या शब्दांत लिहा.
'स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो,' या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हांला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.
‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
'शोध' कथेतील 'टॅक्सी ड्रायव्हर' या पात्रा विषयीचे तुमचे मत लिहा.