Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष.
उत्तर
टॅक्सी ड्रायव्हर हा साधा, सालस व प्रामाणिक वृत्तीचा माणूस होता. दिवसभर टॅक्सी चालवीत असे. प्रसंगी रात्रीही चालवीत असे. तो नुकताच या पेशात आला होता. दिवसा जेवायला मिळाले नव्हते. मध्यरात्री त्याने उसळपाव खाल्ला. अशा त्याने तो कष्टपूर्वक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत होता. आपल्या पेशाला सामाजिक प्रतिष्ठा नाही, मानमरातब नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती; म्हणून अपघातात त्याच्या बाजूने साक्ष दयायला आल्याबद्दल त्याला भिड्यांविषयी प्रचंड कृतज्ञता वाटते. जर भिडे साक्ष दयायला गेले नसते, तर तो आयुष्यातून उठला असता. भिड्यांना त्याचा सालसपणा, प्रामाणिकपणा भावला. म्हणून ते स्वत:हून त्याला मदत करायला गेले. अनू स्वत:ची हकिगत सांगत होती. ती ऐकून तो आतून पूर्णपणे हलून गेला. अनू त्या मुलीशी भावनिकदृष्ट्या बांधली गेलेली पाहून त्याला भरून येते. तो अप्रत्यक्ष रितीने तिच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुकच करतो. पण स्वतः पार गलबलून जातो. कारण ती मुलगी त्याची स्वतःची मुलगी होती. अनूशी बोलताना टॅक्सीवाल्याची वैचारिक व भावनिक प्रगल्भता दिसून येते. गरीब कष्टकरी वर्गातला असूनही त्याची प्रगल्भ वैचारिक बैठक लक्षात येते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अनूने घर सोडले; कारण ______________
अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण ______________
खालील नातेसंबंध लिहा.
अनु आणि आबा ___________
खालील नातेसंबंध लिहा.
भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर ___________
खालील नातेसंबंध लिहा.
अनू आणि सुनीता ___________
कृती करा.
अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी
कृती करा.
आबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये
अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.
‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.
कथेच्या 'शोध' या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
'स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो,' या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हांला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.
‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.
'शोध' कथेतील 'टॅक्सी ड्रायव्हर' या पात्रा विषयीचे तुमचे मत लिहा.