Advertisements
Advertisements
प्रश्न
अनुमापी अनुकूलता.
उत्तर
उदयोगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या काही प्रमुख सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखादा मोठा उद्योग प्रदेशात स्थापित होतो. उदा., लोह-पोलाद. एकदा अशाप्रकारे उदयोग स्थापित झाला की, या मोठ्या उदयोगावर आधारित, त्यावर अवलंबून असणारे आणि या उद्योगाच्या सान्निध्यात अवलंबून असणारे पूरक किंवा साहाय्यक इतर अनेक उदयोग अशा केंद्राकडे आकर्षित होतात. यालाच अनुमापी अनुकूलता असे म्हणतात. उदा., लोह-पोलाद कारखाना सुरू झाल्यानंतर त्यातून उत्पादित होणाऱ्या पोलाद या पक्क्या मालावर आधारित भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग तयार करणे, गाड्यांचे सांगाडे निर्मिती, मोटार गाड्या निर्मिती, यंत्रनिर्मिती असे विविध उदयोग स्थापित होताना दिसतात. लोह-पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणामुळे उद्योगांना लागणाऱ्या विविध पायाभूत सेवा-सुविधा तेथे आधीपासूनच उपलब्ध असतात. या अनुकूलतेचा फायदा उठवून कमी भांडवलात अशा पूरक उद्योगांना सहजपणे आपला जम बसवता येतो. एकाअर्थी अनुमापी अनुकूलतेमुळे उद्योगांना केंद्रित करण्यास प्रोत्साहन मिळते. त्यातूनच भविष्यात तेथे औद्योगिक पाण्याची निर्मिती होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
साखळी पूर्ण करा.
'अ' | 'ब' | 'क' |
लघुउद्योग | हाताने निर्मिती उद्योग | चिनी मातीची भांडी बनवणे |
कुटीरोद्योग | कौशल्यावर आधारित | टाटा लोह-पोलाद उदयोग |
ग्राहकोपयोगी वस्तू | वैयक्तिक | कुंभार |
खाजगी | थेट वापरासाठी तयार | औषधनिर्मिती |
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.
सार्वजनिक उद्योग.
फरक स्पष्ट करा.
वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग
फरक स्पष्ट करा.
अवजड उदयोग आणि हलके उद्योग.
साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
लोहपोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात.
कृषीवर आधारित उद्योग ओळखा.
पुढील चुकीचा घटक ओळखा.
खनिजावर आधारित उद्योग -