Advertisements
Advertisements
प्रश्न
बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते?
लघु उत्तरीय
उत्तर
बाह्य परजीवी आणि अंतःपरजीवी प्राणी त्यांच्या आश्रयदात्या शरीरावर किंवा शरीरात राहून पोषण मिळवतात, त्यामुळे आश्रयदात्याला विविध नुकसान होते. परजीवी प्राणी अन्नासाठी पोशिंद्यावर अवलंबून असतात. बाह्यपरजीवी चूषकासारखे किंवा सुईसारखे मुखावयव वापरून रक्त शोषतात. उदा., डास, ढेकूण इत्यादी. डासांसारखे कीटक मलेरिया, डेंगू यांसारखे रोग संक्रमित करतात. अंत:परजीवी शरीरात राहत असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण होवू शकतात. आपल्या शरीरातले विद्राव्य अन्न शोषून ते आपले कुपोषण करतात. बाह्यपरजीवी व अंत:परजीवी प्राण्यांमुळे आरोग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?