हिंदी

'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

(व्हायोलिनवादनाचा शिकवणीवर्ग सुरू असताना एक धीट मुलगा तेथे येतो.)

मुलगा- पी. जनार्दन, आपणच का?
लेखक- (सुहास्य मुद्रेने) होय.
मुलगा- माझे नाव शिरीष भागवत, घरी मला 'श्री' च म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे.
लेखक- अच्छा, तुला गाण्याची आवड आहे तर!
मुलगा- माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, मी शिकलेले फार आवडेल. मी आपल्याकडे शिकायला येईन; पण माझी एक अट आहे, की माझ्यासोबत माझे वडीलही इथे येतील आणि शिकवणी सुरू असताना वर्गातच बसतील.
लेखक- ठीक आहे, तुझ्या अटी मला मान्य आहेत; पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी द्यावी लागेल!
मुलगा- कबूल आहे, तर मी उद्यापासून येईन आणि माझ्यासोबत माझे वडीलही येतील.
  (दुसऱ्या दिवशी, शिरीष एका वयस्कर व भारदस्त गृहस्थांसोबत शिकवणीवर्गात हजर झाला.)
शिरीष- नमस्कार गुरुजी! हे माझे वडील! (वडिलांकडे पाहून) आणि नाना, हे माझे गुरुजी.
लेखक- नमस्कार! या, या बसा.
  (शिकवणी संपल्यावर लेखकाने व्हायोलिनवर पिलू रागातली गत वाजवून दाखवली. त्यानंतर...)
शिरीष- आपण जाऊया आता.
लेखक- काय, कसं काय वाटलं एकंदरीत?
शिरीष- वा उत्कृष्ट! त्याबद्दल प्रश्नच नाही!
आपण कुठं असता कामाला?...
  (या संवादानंतर शिरीष रोज नानांसोबत शिकवणी वर्गाला येऊ लागला. असेच तीन महिने उलटले. एके दिवशी...)
लेखक- शिरीष, तुझी व्हायोलिनवादनातील प्रगती अशीच कायम राहू दे. तीन महिन्यांनंतर होणाऱ्या आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे.
शिरीष- (उदासपणे) हं.
लेखक- काय रे, तुला आनंद नाही झाला का?
शिरीष- माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल.
  (त्यानंतर पंधरा दिवस शिरीष शिकवणीवर्गाला आला नाही. अचानक कार्यक्रमादिवशी सकाळी तो लेखकाला भेटला.)
लेखक- अरे, तू आहेस कुठे इतके दिवस! तुझा पत्ता तरी काय? आणि आज एकटाच? नाना कसे नाहीत सोबत? इकडची दुनिया तिकडे होईल ना?
शिरीष- (रडवेल्या सुराने) इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. यापुढे मी एकटाच दिसेन! माझे नाना..... मला सोडून गेले. नाना कायमचे गेले हो सर!'
  (आणि तो रडू लागला. लेखकाने त्याचे सांत्वन केले त्यानंतर...)
शिरीष- आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना?
लेखक- (खिन्नपणे) हो.
शिरीष- मग मला आज कार्यक्रम द्या. नाही म्हणू नका सर. माझी एवढीच इच्छा पुरवा.
लेखक- शिरीष, मी तुझ्या भावना समजू शकतो; पण आज माझा नाइलाज आहे. आजच्या या पहिल्याच कार्यक्रमावर आपल्या विद्यालयाची प्रतिष्ठा अवलंबून आहे आणि तू दोन महिने सरावासाठी आला नाहीस, आता तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ?
शिरीष- सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू द्या. नंतर मी जन्मात व्हायोलिनला हात लावणार नाही!
लेखक- तू पुढे जन्मभर वाजव; पण आज वाजवू नको, शिरीष. आज तुझी मन:स्थितीही बरोबर नाही.
शिरीष- मला परवानगी दिलीत, तर माझी मन:स्थिती आपोआपच सुधारेल सर!'
लेखक- ठीक आहे. तू वाजव; पण तुझा कार्यक्रम पहिलाच असेल.
शिरीष- (आनंदून) हो, हो चालेल सर! शतश: धन्यवाद सर!
  (आणि हा नवखा विद्यार्थी कार्यक्रमात धिटाईने व आत्मविश्वासपूर्वक एखाद्या मुरलेल्या वादकाप्रमाणे अप्रतिम व्हायोलिनवादन करत होता. वादन संपताच त्याने आत येऊन लेखकाला चरणस्पर्श केला. त्यानंतर...)
लेखक- (शिरीषला उठवत) शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्या कडे न येता आणखीन कुठे शिकत होतास?
शिरीष- (डोळे पुसत) सर, काय ही भलती शंका! मी तुम्हांला याविषयी सविस्तर सांगतो. सर, ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले. मी ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच कायमचे निघून गेल्यावर आता कशाला शिकायचे, म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते.एका कसल्याशा जबर अपघातात ते ठार बहिरे झाले. बहिरेपणाच्या गैरसोईपेक्षा संगीतसेवा अंतरली याचेच नानांना खूप दु:ख होते. मग त्यांनीच मला वाद्य शिकण्यासाठी प्रेरित केले. ते माझ्यासोबत शिकवणीला येत, कारण ते ऐकू शकत नव्हते, तरी संगीतशास्त्रासाठी कोणीतरी सतत धडपड करतो आहे हे पाहून त्यांना खूप आनंद मिळत असे; पण माझी वादनातील प्रगती, कौशल्य त्यांना कधीच ऐकता येणार नाही हे मला माहीत होते, म्हणून त्यांच्यासमोर वादन करताना मला मोकळेपणा वाटत नव्हता. सर, ज्या दिवशी नाना गेले, त्यादिवशी संगीत बंद करायचे असे मी ठरवले; पण तेव्हा नाना ऐकू शकत नसले तरी आता ते माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत आहेत, ह्याच विचाराने, मी लोकनिंदेची पर्वा न करता पुन्हा व्हायोलिनवादनाला सुरुवात केली. चोवीस तास एकाच ध्यासाने मी सराव करायचो तेव्हा मला पुढील तान व सूर नानाच सांगत आहेत, तबला व तंबोऱ्यावरही तेच साथसंगत करत आहेत, असा भास होई. सर, खरे तर आजही कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी समोर एवढे लोक पाहून गोंधळलो आणि डोळे मिटले; पण नानांची मूर्ती डोळ्यांसमोर आली. ते म्हणाले, 'बेटा वाजव, मी ऐकतो आहे', त्यांच्या या आश्वासक स्वरांमुळे माझा आत्मविश्वास जागृत झाला. मी भूप रागातली गत वाजवायला सुरुवात केली. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक, थिएटर... कोणी नव्हते! तिथे फक्त माझे नाना, मी आणि सूर होते..... (शिरीषचे बोलणे ऐकून लेखक अवाक् होऊन शिरीषकडे पाहतच राहिला.)
shaalaa.com
गद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ - स्वाध्याय [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Marathi 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
स्वाध्याय | Q ८. (आ) | पृष्ठ १०

संबंधित प्रश्न

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....


खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.


खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) कोलाहल (अ) प्रवासी
(२) तऱ्हेवाईक (आ) विचित्र
(३) मुसाफिर (इ) प्रेरित
(४) उद्युक्त (ई) गोंधळ

आकृती पूर्ण करा.


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

दुर्घट- 


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

हव्यास- 


सहसंबंध शोधा.

सावध : बेसावध : : विश्वासू : ______


पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्‌धतीचा घटनाक्रम लिहा.


सूचनेप्रमाणे कृती करा.

वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)


कारणे लिहा.

लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....


लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.


चूक की बरोबर ते लिहा.

इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.


चूक की बरोबर ते लिहा.

लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.


जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(२) श्री. देशमुख (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(४) श्री. कात्रे (ई) शेतीतज्ज्ञ

खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.


समर्पक उदाहरण लिहा.

खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.


फरक स्पष्ट करा.


‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×