Advertisements
Advertisements
प्रश्न
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
उत्तर
पाठातील मला सर्वांत आवडलेली गोष्ट म्हणजे प्रस्तुत पाठाच्या शेवटी शिरीषने मांडलेली संवेदनशील, हळवी व प्रेरक भूमिका.
आपल्या वडिलांच्या आनंदासाठी वादन शिकणारा शिरीष कमी वेळातच वादनात प्रगती व कौशल्य दाखवू लागला; पण कायमच्या बहिरेपणामुळे, संगीतकलेवर जिवापाड प्रेम करणारे वडील मात्र त्याचे वादन ऐकू शकत नव्हते. तरीही तो आपल्यासोबत वडिलांना वादनाच्या शिकवणीवर्गाला घेऊन जायचा. नानांनी (शिरीषचे वडील) जेव्हा या जगाचा कायमचा निरोप घेतला तेव्हा शिरीषने 'संगीत' बंद करण्याचे ठरवले.
परंतु, 'जरी नाना त्यावेळी माझे वादन ऐकू शकले नाहीत तरी आता ते माझ्या शेजारी बसून ऐकत आहेत' या विचारामुळेच शिरीष त्या शोकाकुल परिस्थितीतही सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त झाला. तो चोवीस तास व्हायोलिनवादनाचा ध्यासपूर्वक सराव करत होता. सराव करतानाही तबल्यावर, तंबोऱ्यावर साथीला नानाच बसलेले आहेत असा त्याला भास होई. त्याच्या या जबर ध्यासाने झपाटून केलेल्या मेहनतीचा परिपाक म्हणून विद्यालयाच्या कार्यक्रमात त्याने अप्रतिम व्हायोलिनवादन केले व सर्वांची वाहवा मिळवली. त्याची जिद्द, चिकाटी व मेहनत फळाला आली. 'बेटा वाजव, मी ऐकतो आहे' या नानांच्या आश्वासक शब्दांमुळेच त्या कार्यक्रमात तो देहभान हरपून व्हायोलिनवादन करू शकला.
या प्रसंगातून शिरीषची संवेदनशीलता, कष्टाळूवृत्ती, ध्यासपूर्तीसाठीची जिद्द व सकारात्मक भूमिका मला फार आवडली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) कोलाहल | (अ) प्रवासी |
(२) तऱ्हेवाईक | (आ) विचित्र |
(३) मुसाफिर | (इ) प्रेरित |
(४) उद्युक्त | (ई) गोंधळ |
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
गंमत -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
(१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
(२) | अक्षरशत्रू कुलूप | |
(३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
(४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
सहसंबंध शोधा.
रमेश : नाम : : ते : ______
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
चौकट पूर्ण करा.
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.