Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
उत्तर
भारतीय संविधानानुसार सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळण्याचा अधिकार आहे. दिव्यांग मुलांना सर्वसामान्य मुलांपासून वेगळे ठेवून भेदभाव केला जातो, यामुळे दिव्यांग मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. सर्वसामान्य मुले व दिव्यांग मुले एकत्र शिकल्याने दोन्ही मुलांना सहकार्य, सामंजस्य हे गुण आत्मसात करता येतील. दिव्यांग मुलांना सहानुभूती देण्यापेक्षा ते समाजाचाच एक भाग असून त्यांना ते आहेत, तसेच स्वीकारण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. समान संधी दिल्याने ही मुले स्वावलंबी बनतील व त्यांच्यातील न्यूनगंड दूर होईल. समान शिक्षण संधीमुळे सर्वसामान्य मुलेही दिव्यांगांना समजून घेऊन त्यांना आदरपूर्वक वागणूक देण्यास शिकतील. अशाप्रकारे, समान संधीमुळेच दिव्यांग मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
कारणे लिहा.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.
फरक स्पष्ट करा.
दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्वासक झाड-
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.