Advertisements
Advertisements
प्रश्न
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
आपल्या वडिलांच्या अपघातामुळे अपुरे राहिलेले त्यांचे संगीतसेवेचे स्वप्न वादन शिकून पुरे करण्याची शिरीषची भूमिका मला फार आवडली. वडील ऐकू शकत नाहीत हे माहीत असतानाही, आपल्या वडिलांच्या आनंदासाठी, सुखासाठी तो स्वत: व्हायोलिनवादन शिकतो. त्या शिकवणीवर्गाला आपल्या वडिलांना सोबत घेऊन जातो.
वडिलांच्या निधनानंतरही लोक काय म्हणतील याची पर्वा न करता, त्यांच्यावरील प्रेमापोटी तो संगीतसाधना करतो. या त्याच्या भूमिकेमागे एक प्रेमळ, पित्यावर मनापासून प्रेम करणारा, संवेदनशील मुलगा दडला आहे. जसे त्याने कठीण प्रसंगावर मात केली, मेहनत, जिद्द व चिकाटीच्या बळावर सराव करून अप्रतिम व्हायोलिनवादन केले, तसेच आपणही जीवनातील संकटे, अडीअडचणींनी खचून न जाता यश मिळवले पाहिजे. आपल्या आईवडिलांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. एखादी कृती करायला सांगण्यामागे आपल्या आईवडिलांचा दृष्टिकोन काय असेल, याचाही आपण सारासार विचार केला पाहिजे, तसेच त्यांनी आपल्याकरता उपसलेल्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्या सुखासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, हा संदेश शिरीषच्या भूमिकेद्वारे आपल्याला मिळतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) कोलाहल | (अ) प्रवासी |
(२) तऱ्हेवाईक | (आ) विचित्र |
(३) मुसाफिर | (इ) प्रेरित |
(४) उद्युक्त | (ई) गोंधळ |
'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
फुकट -
आकृती पूर्ण करा.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
आकृती पूर्ण करा.
'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
सहसंबंध शोधा.
सावध : बेसावध : : विश्वासू : ______
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
चौकट पूर्ण करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.