Advertisements
Advertisements
प्रश्न
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर
आई-वडील यांच्यानंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरू असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती देत असतात. विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही ते करत असतात. शिक्षकांकडून मिळालेली कौतुकाची थाप विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवते, त्यामुळे त्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासही मदत होते.
मी इयत्ता आठवीत असताना मला गणित विषयाची फार भीती वाटत असे. आमच्या गणित विषयाच्या शिक्षिका सौ. भिसे बाई यांनी एके दिवशी मला बोलावले व समजावले, की 'गणित हा विषय सरावाने छान जमेल तुला. तुझं गणित अगदीच काही कच्चं नाही. तुला काही अडचण आलीच, तर तू कधीही मला विचार.' त्यानंतर, मी नियमितपणे गणिताचा सराव केला. सौ. भिसे बाईंचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत होतेच. त्यानंतरच्या सहामाही परीक्षेत मी गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवले. त्यावर बाईंनी माझे संपूर्ण वर्गासमोर खूप कौतुक केले. अशाप्रकारे, भिसे बाईंमुळे माझी गणिताविषयी भीती कायमची दूर झाली. माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणूनच मला वाटते, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.
फरक स्पष्ट करा.
दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
चौकट पूर्ण करा.
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
चूक की बरोबर ते लिहा.
इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
फरक स्पष्ट करा.
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.