Advertisements
Advertisements
प्रश्न
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
उत्तर
गावात सखू आजींच्या शब्दाला विशेष मान होता. त्यांच्यातील मला भावलेले दोन गुण म्हणजे सखू आजीचा प्रेमळ स्वभाव व प्रतिभासंपन्नता होय. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याशी बोलावेसे वाटे. लहान मुलांना त्या गोष्टी सांगत, त्यामुळे मुलांच्या मनात आजीविषयी ओढ होती, तर गावच्या बाबतीतील भल्या-बुऱ्या गोष्टींचा त्या योग्य पद्धतीने विचार करत व त्यानुसार निर्णय घेत असत. सर्वांचे भले व्हावे, असा विचार सखू आजीच्या कृतींतून दिसून येतो. गावातील लोकांनी शिक्षित व्हावे, म्हणून त्यांनी केलेली धडपड, गावातील तरुणांच्या प्रगतिबद्दल त्यांचे कौडकौतुक करण्यासाठी घेतलेला पुढाकार या सर्वांतून त्यांच्या प्रेमळपणाची प्रचीती येते.
सखू आजी प्रतिभावंत होत्या. त्या बोलता-बोलता छान कविता करत असत. हे सारे त्या ठरवून करत नव्हत्या, तर ती त्यांना उपजत लाभलेली देणगी होती. छोट्या-छोट्या कविता करून त्या आपले विचार मांडत असत. काल्पनिक कथा तयार करून लहान मुलांचे मनोरंजन करत असत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
कारणे लिहा.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
सहसंबंध शोधा.
सावध : बेसावध : : विश्वासू : ______
व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
कारणे लिहा.
पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.