Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
भारताचे अर्धांग जे स्त्रिया; त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत 'माता' म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो, हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी, जपानच्या धर्तीवर इ. स. 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात, महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्रीशिक्षणाचे माहात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्रीशिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांत त्यांना दोन कार्य करावयाची होती. एका टोकावर, स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर, तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य ! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मत:च महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. |
(1) आकृती पूर्ण करा: (2)
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली दोन कार्य | |
जटिल कार्य | अटीतटीचे कार्य |
____________ | ____________ |
(2) नावे लिहा: (2)
- महर्षी कर्वे यांचे जन्मगाव.............
- वाङ्मयाची जननी.............
(3) स्वमत: (3)
'स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे,' या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.
उत्तर
(1)
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली दोन कार्य | |
जटिल कार्य | अटीतटीचे कार्य |
स्त्री साक्षर करणे. | पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे. |
(2)
- शेरावली
- सरस्वती
(3) महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मत होते की, स्त्रीशिक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहे. जर स्त्रिया निरक्षर राहिल्या, तर देशाची प्रगती अर्धवट राहील. शिक्षणामुळे स्त्रिया स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक होतात आणि आत्मनिर्भर बनतात. त्यांनी स्त्रियांना उच्च शिक्षण मिळावे, त्या स्वाभिमानी बनाव्यात आणि पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतराव्यात, यासाठी अथक प्रयत्न केले. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना शिक्षण मिळणे कठीण होते, परंतु त्यांनी हा विरोधाभास दूर करण्यासाठी महिला विद्यापीठ स्थापन करून स्त्रीशिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे समाजातील स्त्रियांचे स्थान उंचावण्यास मदत झाली.