हिंदी

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. जे केलेच पाहिजे ते करावयाचे राहून जाते. जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते. हे सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडून जाते. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) खालील विधाने बरोबर का चूक ते लिहा:             2

    1. तहान लागली की आपण सरबत पितो. 
    2. काही गोष्टी स्वभावानुसार, गरजेनुसार केल्या जातात.
    3. व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते.
    4. थकवा आला की आपण काम करतो.

        जे केलेच पाहिजे ते करावयाचे राहून जाते. जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते. हे सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडून जाते. काही गोष्टी स्वभावानुसार, गरजेनुसार केल्या जातात. तहान लागली की आपण पाणी पितो, भुकेच्या वेळी खातो. थकवा आला की बसतो, पडतो किंवा झोपतो; पण शरीरश्रम किंवा व्यायाम मुद्दाम कधीच करीत नाही. लहानपणी धावणे, पळणे, खेळणे खूप होते. मोठेपणी यातले मागे काही उरत नाही. स्त्रियांना तर त्यांच्या दिनचर्येची चाकोरी सोडून बाजूला सरकता येत नाही. हाल अधिक, पण हालचाल कमी अशी त्यांची स्थिती असते.

        आपल्या जीवनातील अनेक दुःखे केवळ शारीरिक हालचालींच्या आणि विशेषतः सर्वांगीण व शिस्तबद्ध व्यायामाच्या अभावातून निर्माण होतात; हे एक साधे सरळ जीवनसत्य माणसांना उमगत नाही. 

(2) विधाने पूर्ण करा:          2

  1. ते न चुकता केले जाते, जे ______.
  2. आपण तेव्हा झोपतो, जेव्हा आपल्याला ______.
आकलन

उत्तर

(1)

    1. हे विधान चूक आहे.
    2. हे विधान बरोबर आहे.
    3. हे विधान बरोबर आहे.
    4. हे विधान चूक आहे.

(2) 

  1. ते न चुकता केले जाते, जे नाही केले तरी चालेल.
  2. आपण तेव्हा झोपतो, जेव्हा आपल्याला थकवा येतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×