हिंदी

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा.

दीर्घउत्तर

उत्तर

  1. १९९९ मध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केली. या घुसखोरीतून भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. हे युद्ध प्रामुख्याने कारगिल-द्रास भागात घडले. यामुळे या युद्धास कारगिल युद्ध म्हणतात.
  2. ‘ऑपरेशन विजय’ या मोहिमेअंतर्गत भारताने पाकिस्तानला नमवले. या युद्धाच्या निमित्ताने लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देण्याची गरज निर्माण झाली.
  3. लष्कराचे आधुनिकीकरण, शस्त्रास्त्र सज्जता, सैनिकांचे प्रशिक्षण या संदर्भात अधिक जागरूकता आली.
  4. २००९ मध्ये भारताने अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या ‘अरिहंत’ या पाणबुडीची निर्मिती केली. ही भारतातील पहिली अत्याधुनिक अशी अण्वस्त्रवाहक पाणबुडी होय.
  5. अशा पाणबुडीची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान साध्य करणारा भारत हा जगातील सहावा देश ठरला. या प्रकल्पात सरकारने खासगी उद्योजकांचीसुद्धा मदत घेतली होती.
  6. पुढील काळात भारताने संरक्षण क्षेत्रात स्वदेशी (मेक इन इंडिया) तंत्रज्ञान वापरणे, सैन्यात महिला अधिकाऱ्यांची भरती याकडे लक्ष दिले. याच्याच जोडीला भारताने विविध देशांच्या सैन्यांबरोबर लष्करी सराव करण्यावर भर दिला आहे.
  7. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करणे, दहशतवाद्यांशी मुकाबला करणे, स्वतःच्या क्षमता वाढवणे, दहशतवादाचा बिमोड करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
  8. या धोरणातून भारत आणि ओमान देशाचे लष्कर यांच्यात हिमाचल प्रदेशातील ‘बकलोह’ येथे संयुक्त सराव झाला. नपाळी सैन्याबरोबरच्या सरावात डोंगराळ भागात दहशतवाद्यांशी कसे लढायचे यावर भर देण्यात आला.
  9. जम्मू-काश्मीर रायफल्सचे सैनिक आणि मंगोलियाचे लष्कर यांच्यात संयुक्त सराव झाला. भारत व अमेरिका यांच्या संयुक्त सैन्याचा सराव अमेरिकेत झाला. श्रीलंकेच्या सैन्याबरोबरचा संयुक्त सराव महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात आयोजित केला गेला.
  10. सैन्यदलात प्रवेश करणे हा तरुण-तरुणींसाठी आपली कारकीर्द घडवण्याचा उत्तम मार्ग आहे. महिलांसाठी सैन्यात किमान आठ विभागात अल्पकालीन सेवा करण्याची (Short Service Commission) संधी उपलब्ध आहे.
shaalaa.com
संरक्षणविषयक घडामोडी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×