हिंदी

काश्‍मीरच्या भारतातील विलीनीकरणाची माहिती लिहा. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

काश्‍मीरच्या भारतातील विलीनीकरणाची माहिती लिहा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

  1. भारत स्वतंत्र झाल्यावर भारत आणि पाकिस्तान यांपैकी कोणत्याही एका देशात सामील न होण्याचा निर्णय जम्मू-काश्मीरचा राजा हरिसिंग याने घेतला होता.
  2. काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता. यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले.
  3. २२ ऑक्टोबर १९४७ रोजी या संस्थानावर पाकिस्तानी सीमेवरील सशस्त्र टोळ्यांनी आक्रमण केले.
  4. दोन्ही देशांपासून आपले स्वतंत्र अस्तित्व राखू इच्छिणाऱ्या राजा हरिसिंगने काश्मीरच्या संरक्षणासाठी भारताकडे लष्करी सहकार्य मागितले.
  5. २७ ऑक्टोबर १९४७ रोजी राजा हरिसिंगने आपले संस्थान भारतात विलीन करण्यास परवानगी दिली. भारत सरकारकडे आपला सामीलनामा सुपूर्द केला. अशा प्रकारे काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी गेले.
  6. लष्कराने काश्मीरचा मोठा भाग घुसखोरांच्या हातून परत मिळवला. काही भाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला.
  7. जानेवारी १९४८ मध्ये भारताने काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेला.
  8. दोन देशांमधील काश्मीरच्या या वादास आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. काश्मीरमधून पाकिस्तानी सैन्य काढून घेणे राष्ट्रसंघाला देखील शक्य झाले नाही.
  9. परंतु प्रौढमताधिकाराच्या आधारे तत्कालीन नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या सरकारने घटनासभेसाठी मतदान घेतले. घटनासभेने भारतात विलीन होण्यावर शिक्कामोर्तब केले.
  10. जम्मू-काश्मीरची घटना अमलात आली व तेव्हापासून जम्मू-काश्मीर हा भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७० अन्वये काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला होता.
shaalaa.com
निर्वसाहतीकरण ते एकीकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×