Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणांसह स्पष्ट करा.
टिप्पणी लिखिए
उत्तर
भारतीय द्वीपकल्पीय भागामध्ये भारतातील प्रमुख जलविभाजक आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत.
- पश्चिम घाट –
- भारतीय द्वीपकल्पाच्या भागात पश्चिमेकडील भागात दक्षिणोत्तर पसरलेली पर्वतांची रांग ही पश्चिम घाट म्हणून ओळखली जाते.
- या प्रदेशात अनेक पश्चिमवाहिनी नद्या व गोदावरी, कृष्णा, कावेरी इत्यादी पूर्ववाहिनी नद्या उगम पावतात.
- अरवली पर्वतरांगा –
- भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील भागात नैऋत्य-ईशान्य दिशेने अरवली पर्वतरांगा पसरल्या आहेत.
- या पर्वतरांगांच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी नैऋत्य दिशेने कच्छच्या रणाकडे वाहत येते, तर बनास ही चंबळ नदीची उपनदी ईशान्य दिशेने वाहत जाते.
यामुळे, अरवली पर्वतरांगांनादेखील जलविभाजक म्हणता येते.
- विंध्य पर्वतरांगा: विंध्य पर्वत गंगानदी खोरे व नर्मदा नदी खोरे विलग करते.
- सातपुडा पर्वतरांग: सातपुडा पर्वतरांग नर्मदा नदी खोरे व तापी नदीचे खोरे विलग करते.
- हिमालय पर्वतरांगा: हिमालय पर्वतरांगा हिमालयातील काही नद्या व हिमालयापलीकडील रांगांतून वाहणाऱ्या नद्यांना विलग करत असल्याने हिमालय जलविभाजकाची भूमिका बजावतो असे म्हणता येते.
shaalaa.com
भारताची जलप्रणाली
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?