Advertisements
Advertisements
प्रश्न
'बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर
बहिणाबाईकडे असामान्य काव्यप्रतिभा होती. ग्रामीण जीवन व कृषिजीवन यांच्याशी निगडित संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे ग्रामीण भावजीवन आणि कृषी जीवन यांचे अर्थपूर्ण व भावपूर्ण तपशील त्यांच्या कवितांत सहज आढळतात. या तपशिलांच्या साहाय्याने त्या माणसाच्या अंतरंगातील विसंगत व विपरीत वृत्ती-प्रवृत्तीवर बोट ठेवतात. माणूस काय गमावत चालला आहे आणि त्याने काय कमावले पाहिजे, हे त्या कळकळीने सांगतात.
बहिणाबाईच्या काव्याचा सर्वप्रथम कोणता गुण जाणवत असेल, तर तो म्हणजे सहजता हा होय. कोकीळ पक्ष्याने तोंड उघडले की, आपोआपच संगीत वाहू लागते. फुलांमधला सुगंध नैसर्गिक ऊमींतून सहज दरवळतो. बहिणाबाई या निसर्गाशी इतक्या समरस झाल्या आहेत. की, निसर्गाच्या सगळ्या प्रेरणा, ऊर्मी त्यांच्या शब्दाशब्दांतून सहज उचंबळून येतात. त्यांना काव्य लेखनासाठी वेगळी समाधी लावून बसावे लागत नाही किंवा वेगळ्या मनःस्थितीची त्यांना गरज वाटत नाही. घरात किंवा शेतात त्या नित्याची कामे करत असतात तेव्हा, किंवा निसर्गाची विविध रूपे सहज नजरेस पडतात तेव्हा त्यांच्या ओठांतून सहज कवितांच्या ओळी बाहेर पडतात. जात्यामधून धान्याचे पीठ जितके सहजगत्या बाहेर पडते, तितके सहजगत्या त्यांच्या ओठांतून शब्द बाहेर पडतात. त्यांच्या कवितेला निसर्गाचीच लय आपसूक लाभलेली आहे. जितक्या सहजतेने आपण श्वास घेतो इतक्या सहजतेने त्यांची कविता 'निर्माण होते. असे वाटते की काव्य जणू काही बहिणाबाईंच्या ओठातून बाहेर पडण्याची वाटच पाहत असते. म्हणून लेखक म्हणतात की, बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेचे त्यांच्याबरोबर.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
कृती करा.
बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष
कृती करा.
अमर काव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे
तुलना करा.
मुद्दे | माणूस | प्राणी |
वर्तणूक | ||
इमानिपणा |
खालील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.
घटना | परिणाम |
(१) कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे. | ______ |
(२) प्राजक्ताची कळी उमलणे. | ______ |
(३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेला असणे. | ______ |
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे -
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
बहिणाबाई प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता -
'बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे,' हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!' या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.