हिंदी

बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

बहिणाबाई या निरक्षर, अशिक्षित होत्या. त्यामुळे त्यांची गाणी, कविता या सामान्य दर्जाच्या, जुनाट वळणाच्या असतील, असे कोणाचे मत होऊ शकते. पण त्या तशा नाहीत. त्यांच्या कविता रचनेच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक आहेत. तसेच, त्या आशयाच्या दृष्टीनेसुद्धा अत्यंत आधुनिक आहेत. त्यांचे विचार, कल्पना आधुनिक काळातल्याच आहेत. त्यांचे सर्व विचार आजच्या काळातही पूर्णपणे लागू पडतात.।
बहिणाबाईंची प्रत्येक कविता परिपूर्ण आहे. प्रत्येक कवितेत एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. कवितेचा प्रारंभ आणि शेवट यांत नाट्यात्मकता आहे. ही बाब आधुनिक आहे. कवितेच्या रचनेकडे त्यांचे खास लक्ष आहे, हे दिसून येते. कवितेतला विचार किंवा भावना फापटपसारा न लावता सांगतात. कमीत कमी आणि नेमक्या शब्दांत आपला आशय मांडतात. यासाठी फार मोठे भाषिक आणि वैचारिक कौशल्य लागते. ते बहिणाबाईंकडे पुरेपूर आहे.
आपली कविता लोकांना आवडावी; लोकांनी ती सतत गुणगुणत राहावी, यासाठी बहिणाबाई जाणीवपूर्वक कर्णमधुर शब्दांचा वापर करतात, असे दिसत नाही. आशयाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा सोप्या सोप्यासोप्या, छोट्याछोट्या व सुंदर शब्दांची योजना त्या करतात. हेही त्या मुद्दाम करतात असे नव्हे. बहिणाबाई या निसर्गाशी व खेड्यातील समाजजीवनाशी निर्मळ मनाने समरस झाल्या आहेत. निसर्गाचे दर्शन घेत असताना, घरात, शेतात काम करीत असताना त्या गुणगुणत कविता निर्माण करतात. त्यामुळे कामातली, निसर्गातली लय त्यांच्या कवितेला मिळते. म्हणूनच त्यांच्या कवितेतले शब्द सहजगत्या अवतरतात. हे सर्व आधुनिक आहे.
अहिराणी भाषेचा उपयोग तर बहिणाबाईंच्या कवितेला एक वेगळेच अलंकार चढवतो. त्या भाषेतला सर्व गोडवा, सर्व सौंदर्य त्यांच्या कवितेला मिळते. भाषा अपरिचित म्हणून कविता अपरिचित राहत नाही. त्यांची कविता वाचता वाचता आपोआप कळत जाते; हे त्यांच्या कवितेचे फार मोठे सामर्थ्य आहे.

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.05: परिमळ - कृती [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
अध्याय 1.05 परिमळ
कृती | Q (४) (आ) | पृष्ठ २४

संबंधित प्रश्न

पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.


संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,


कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____


कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______


कारणे लिहा.

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!


'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.


सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.


'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.


आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक


'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______


चुकीचे विधान शोधा.


फरक स्पष्ट करा.

प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक
   
   
   

खालील कृती करा.


खालील कृती करा.


खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन  

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत परिणाम
नाटकात संघर्ष असला तर  

स्वमत.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकाचे नेपथ्य


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा


स्वमत.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.


स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×