Advertisements
Advertisements
प्रश्न
भिंगाविषयीच्या संज्ञा स्पष्ट करणारी आकृती काढा.
उत्तर
(१) भिंगाचे वक्रता केंद्र (C) : भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे, त्याच्या केंद्रास भिंगाचे वक्रता केंद्र (C) म्हणतात. प्रत्येक भिंगास C1 व C2 अशी दोन वक्रता केंद्रे असतात.
(२) भिंगाच्या वक्रता त्रिज्या (R) : भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलांचे भाग असतात, त्या गोलांच्या त्रिज्यांना (R1 व R2) भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात.
(३) भिंगाचा मुख्य अक्ष : भिगांच्या दोन्ही वक्रता केंद्रांतून जाणारी काल्पनिक सरळ रेषा म्हणजे भिंगाचा मुख्य अक्ष होय.
(४) भिंगाचे प्रकाशीय केंद्र (O) : प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही, अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र (O) म्हणतात.
(५) भिंगाची मुख्य नाभी (F) : जेव्हा भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाशकिरण भिंगावर पडतात, तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात (एकत्र येतात) [बहिर्गोल भिंग] किंवा मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून अपसारित होतात (बाहेर पडतात) असे वाटते [अंतर्गोल भिंग]. या बिंदूस भिंगाची मुख्य नाभी (F) म्हणतात. प्रत्येक भिंगाला दोन मुख्य नाभी (F1 व F2) असतात.
(६) भिंगाचे नाभीय अंतर (f) : भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य (प्रकाशीय केंद्र) यांमधील अंतराला भिंगाचे नाभीय अंतर (f) म्हणतात. प्रत्येक भिंगाला दोन नाभीय अंतरे (f1 व f2) असतात.
बहिर्गोल व अंतर्गोल भिंगाचे काटछेद
C1, C2 : वक्रता केंद्र R1, R2 : वक्रता त्रिज्या;
O : प्रकाशीय केंद्र (≡ प्रकाशीय मध्य)
भिंगाचे प्रकाशीय केंद्र (O)
भिंगाची नाभी व भिंगाचे नाभीय अंतर
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे _______ अपवर्तन होते.
प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे _____ म्हणतात.
_____ भिंग नेहमी आभासी व खूपच छोटी प्रतिमा तयार करतात.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
नावे लिहा.
प्रकाशीय केंद्र व वक्रता केंद्र यामधील अंतर.
नावे लिहा.
भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा.
आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल , तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो.
व्याख्या लिहा.
भिंगाचे वक्रता केंद्र
व्याख्या लिहा.
भिंगाचे प्रकाशीय केंद्र
व्याख्या लिहा.
मुख्य नाभी