Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)
आकलन कृती
१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
- परिच्छेदामध्ये कोणत्या महिन्याचा उल्लेख आला आहे?
- झाड कोणत्या रंगांनी भरून टाकलं आहे?
चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. |
२. आकलन कृती
१. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२)
- पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______
- हृदयाला आनंद बहाल करणारा ______
उत्तर
१.
- परिच्छेदामध्ये चैत्र महिन्याचा उल्लेख आला आहे.
- झाड फिक्या आणि गडद हिरव्या रंगांनी भरून टाकलं आहे.
२.
- पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं खूप देखणं आहे.
- हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अपठित गद्य
प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा.
(i) रामेश्वरम बेटावरील इंग्रजी जाणणारा एकमेव माणूस -
(ii) कलाम याना वाचनासाठी उत्तेजन देणारे -
(iii) रामनाथपुरमला जाण्यासाठी वडिलांकडे परवानगी मागणारे -
(iv) रामेश्वरम येथील वर्तमानपत्रlचे वितरक -
जलालुद्दीन फारसा शिकला नाही पण त्याने अब्दुल कलामना मात्र शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले. रामेश्वरम बेटावर इंग्रजी जाणणारा तो एकटाच माणूस होता. त्यानेच अब्दुल कलामना नवनव्या वैद्यानिक शोधांबद्दल, साहित्याबद्दल, आधुनिक उपचारपद्धतीबद्दल ओळख करून दिली. त्यांच्या गावात एस. टी. आर माणिकन् नावाचे एक माजी क्राांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह होता. त्यांनी कलाम याना पुस्तक वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. शमसुद्दीन नावाच्या दूरच्या भावाचा कलामवर प्रभाव होता. तो रामेश्वरममध्ये वर्तमानपत्राचा वितरक होता. रेल्वेने पंबन गावाहून वर्तमानपत्राचे गठ्ठे येत. पुढे शमसुद्दीन त्याचे वाटप करी. दिनमणी हे सर्वात लोकप्रिय तमीळ वृत्तपत्र होते. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. चालत्या गाडीतून ते गठ्ठे फेकले जात. ते गोळा करण्याच्या कामात शमसुद्दीनला कलाम मदत करू लागला. अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई! दुसरे महायुद्ध संपल्यावर रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी, रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी कलामांनी वडिलांकडे परवानगी मागितली. वडील म्हणाले, ‘‘अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिकण्यासाठी बाहेर जायला हवे.’’ शमसुद्दीन आणि जलालुद्दीन कलामबरोबर रामनाथपुरमला गेले. कलामने कलेक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. जलालुद्दीन म्हणाला, ‘‘मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणत जा. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.’’
(२) परिणाम लिहा.
(i) दुसरे महायुद्ध पेटले.
(ii) कलाम वृत्त पत्रे गोळा करण्या च्या कामात मदत करू लागले.
(३) विशेषण-विशेष्य यांच्या जोड्या जुळवा.
(४) स्वमत - पाठाच्या आधारे आशावादी विचारांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उतारा वाचून दिलेल्या कृती करा.
(अ) तक्ता पूर्ण करा.
जंगलाचा स्वभाव | माणसाचा स्वभाव |
(१) ______ | (१) ______ |
(२) ______ | (२) ______ |
जंगलाने सर्वांचे स्वागत केले-दिलखुलास, मनमोकळे. जंगलाचा स्वभावच असा मोकळाढाकळा असतो. अढी धरावी, तेढ बाळगावी यासाठीसुद्धा एखादा कोपरा लागतो. जंगलाला असा कोपरा नसतो. माणसं आणि त्यांची घरं यांना कोपरे असतात म्हणून ती जंगलाइतकी मुक्त, मोकळी नसतात. जंगल मनमोकळे असते. सहजसुंदर असते. ऊनपावसाशी ते लपंडाव खेळते. थंडीवाऱ्याशी गप्पा मारते. फुलताना, खेळताना, डुलताना, हसताना ते मनापासून सगळे काही करते. एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस, भामरागडच्या जंगलाची वेश बदलण्याची वेळ, तर त्या जंगलाने अंगाखांद्यावरची पर्णभूषणे ढाळलेली दिसली. त्यातही संकोच नाही, की संशय नाही. त्यामुळे जमीन दिसू नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुदूर सडा. राखाडी, पिंगट रंगाचा. वारा हलकेच त्यात शिरायचा तेव्हा सळसळ आवाज व्हायचा. नागमोडी पाऊलवाटेने जेव्हा पावले त्यावर पडायची तेव्हा त्यातून चर्रचर्र आवाज उठायचा. जणू जंगल बोलते आहे असे वाटते. जंगल कुजबुजते आहे असे भासते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो तेव्हा तो गाणे होऊनच घुमत घुमत बाहेर पडतो. पानं, फांद्या, फुलं सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते. पावसाच्या सरी झेलते. सचैल न्हाते. भिजत चिंब होऊन जाते. -राजा मंगळवेढेकर. |
(आ) चौकटी पूर्ण करा.
(इ) खालील कृती करा.
(१) खालील शब्दांची जात ओळखा.
(i) | ![]() |
(ii) | ![]() |
(२) सूचनेप्रमाणे सोडवा.
(i) जंगल मनमोकळे असते. (काळ ओळखा.)
(ii) सहसंबंध लिहा. - कोपरे : `square` पाने : पान
- स्वमत.
जंगलाचा मनमोकळा स्वभाव सोदाहरण स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)
आकलन कृती
१. उत्तर लिहा. (०२)
- ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
- फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो?
पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते. नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य! या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात. |
२. आकलन कृती
१. पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (०२)
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)
आकलन कृती
१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
- परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
- झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.
चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. |
२. आकलन कृती
१. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२)
- पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______
- हृदयाला आनंद बहाल करणारा ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)
आकलन कृती
१. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
i. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात. (०१)
अ) कारण ते आधी दुसऱ्याचा विचार करतात नंतर स्वत:चा विचार करतात.
ब) कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात.
क) त्यांच्या दृष्टीने नातं ही एका अंतरावरली गोष्ट असते.
ड) त्यांच्या दृष्टीने नातं अवकाश देणारे असावे.
ii. आपल्या दृष्टीने नातं ही एक ______ (०१)
अ) गुंतलेली गोष्ट असते.
ब) विखुरलेली गोष्ट असते.
क) अंतरावरील गोष्ट असते.
ड) आपल्यासाठी सोईची गोष्ट असते.
दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बऱ्याचदा आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो. |
२. आकलन कृती
१. वैशिष्ट्ये लिहा. (०२)
खऱ्या नात्यामधील संवेदना
- ______
- ______
- ______
- ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (२)
i. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात. (१)
अ) कारण ते आधी दुसऱ्याचा विचार करतात नंतर स्वत:चा विचार करतात.
ब) कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात.
क) त्यांच्या दृष्टीने नातं ही एका अंतरावरली गोष्ट असते.
ड) त्यांच्या दृष्टीने नातं अवकाश देणारे असावे.
ii. आपल्या दृष्टीने नातं ही एक _____ (१)
अ) गुंतलेली गोष्ट असते.
ब) विखुरलेली गोष्ट असते.
क) अंतरावरील गोष्ट असते.
ड) आपल्यासाठी सोईची गोष्ट असते.
दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बर्याचदा आपल्य दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो. |
२) वैशिष्ट्ये लिहा. (२)
खऱ्या नात्यामधील संवेदना
- ______
- ______
- ______
- ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृतिबंध पूर्ण करा: (2)
अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कारण आहे? संकटे ही काही कायमची नसतात ना? मग त्यांच्याकडे सोशिकपणे, खिलाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी का असू नये? संकटांचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते, तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात; परंतु ती ओसरल्यावर, आपण त्यांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही. आपण घाबरतो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचणींचे खरेखुरे स्वरूप आपणांस कळलेले नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा-विनोद करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. |
(2) कधी ते लिहा: (2)
- आपण संकटांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही.
- आजारी, संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (2)
सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशाजवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होते. जगात वावरताना सौजन्यशील वृत्ती अंगी बाणलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात; पण त्याहीपेक्षा आपण माणुस आहोत, पशू नाही याची जी जाणीव होते तीच महत्त्वाची असते. ज्याची वृत्तीच आक्रमक असते आणि ज्यांचा स्वभाव जुळवून घेण्याचा नसतो, त्यांची वृत्ती ही स्वभावत: पशूची असते. त्यामुळे, त्यांच्याजवळ सौजन्य असेल कसे? सौजन्य ही मानसिक वृत्ती आहे. मनातून ती साकारते व कृतीतून प्रकट होते. व्यवहारात अशा वृत्तीतून जे वागणे होते किंवा आचार घडतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते. |
2. चौकटी पूर्ण करा. (2)
- सुजनांकडून अपेक्षित असलेले - ______
- सौजन्यातून व्यक्त होणारे - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. योग्य जोड्या लावा. (2)
‘अ’ गट | ‘ब’ गट | |
(i) | दागिने | माचल |
(ii) | गुरु | मागे फिरणे |
(iii) | चोर | साडी |
(iv) | माघारी | स्त्री |
(v) | नऊवारी | शिष्य |
पण रत्नप्रभा क्षणभर विचलित झाली. ती म्हणाली, “मी नखशिखांत दागिन्यांनी मढून तुमच्या घरी येईन. असे वचन मी माझ्या गुरुजींना दिलं आहे आणि मी दिलेला शब्द नेहमीच पाळते.” पण मी माझ्या गुरुंना भेटून परत येताना हे सर्व दागिने तुम्हाला देईन. तिचं उत्तर ऐकून त्या चोराला फार आश्चर्य वाटलं. त्याने तिला जाऊ दिलं, पण तिच्यामागोमाग गुपचूप पाठलाग करत तोही निघाला. आता नक्की काय होणार, हे त्याला बघायचं होतं. रत्नप्रभा गुरुजींच्या घरी जाऊन पोहोचली. तिनं त्यांचा दरवाजा ठोकावला. गुरुजींनी दार उघडलं. दागिन्यांनी मढलेल्या रत्नप्रभेला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच, पण खेदही वाटला. ते म्हणाले, “मला वाटलं, तू माझं बोलणं विनोद समजून हसण्यावारी नेशील. तुला नाउमेद करण्यासाठी मी आपलं तसं म्हणालो. या एवढ्या संकटांना तोंड देऊन तू इथे येशील, असं मला मुळीच वाटलं नव्हतं. तू घरी जा, पोरी माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तू आपला शब्द पाळणारी स्त्री आहेस.” रत्नप्रभा माघारी फिरली, तेवढ्यात तो चोर तिच्यासमोर येऊन उभा राहिला. ती त्याला म्हणाली, “मी तुम्हाला हे सगळे दागिने द्यायचं कबूल केलं होतं ना? तुम्ही ते घ्या.” त्यावर तो चोर हसून म्हणाला, “तुमच्यासारखी स्त्री सापडणं विरळाच. मला तुमच्याकडून काहीसुद्धा नको. तुमच्यासारखी माणसं काही नेहमी भेटत नसतात.” |
२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)
- गुरुकडे जाणारी - ______
- रत्नप्रभाचा पाठलाग करणारा - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. योग्य जोड्या लावा. (2)
‘अ’ गट | ‘ब’ गट | |
(i) | चंदीपूर | चेन्नई |
(ii) | अण्वस्त्र चाचण्या | शिक्षणाची सोय |
(iii) | अण्णा युनिव्हर्सिटी | ओरिसा |
(iv) | खेड्यापाड्यात | जावेद मियाँदाद |
(v) | लहान पोरगा | डॉ. कलाम |
त्या भेटीनंतर कधीही चेन्नईला जाण्याचा योग आला, की मी अण्णा युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांची गाठ घेत असे. ते तेथे अध्यापन करत असत. आम्ही तेव्हा अनेक विषयांवर बोलत असू; परंतु आमच्या बोलण्याचा मुख्य विषय म्हणजे- खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची सुविधा कशी पोहोचवायची, हाच असे. श्री. कलाम यांना आपल्या स्वतःच्या शिक्षकांविषयी नितांत आदर आहे, त्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी कमालीची कृतज्ञता आहे. मी एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले असताना चंदीपूरमध्ये जावेद मियाँदाद नावाच्या एखादा लहानशा कोळ्याच्या पोराकडून आयुष्यातील फार मोठं चिरंतन सत्य शिकले होते. जावेदने मला सांगितले होतं- ‘गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जाणं केव्हाही उत्तम.’ या अनुभवाविषयी मी कलाम यांना सांगत होते. कलाम यांनी त्याचे हे उद्गार ताबडतोब एका चिट्ठीवर लिहून घेतले आणि म्हणाले, “केवढा मोठा विचार हा!” ओरिसा हे त्यांचं अत्यंत आवडतं राज्य असल्याचं त्यांनीच मला सांगितलं, अण्वस्त्र चाचण्यांसाठी आयुष्यातील वीस वर्षे ते ओरिसातच राहिले होते. “तुम्ही जर ओरिसामध्ये कोणताही समाजकार्याचा उपक्रम हाती घेतलात, तर त्यासाठी मी जरूर येईन,” ते म्हणाले. तुम्ही तिथे बरचं काम करता आणि ओरिसा या राज्याविषयी तुम्हांलासुद्धा पुष्कळ आपुलकी आहे. याची मला कल्पना आहे. |
२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)
- ओरिसा, हे यांचे आवडते राज्य होते - ______
- लेखिकेला ओरिसा राज्याविषयी वाटणारी - ______
पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
जागा मंजूर झाल्याचं पत्र शासनाकडून मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकशाला जाऊन धडकले. २३ डिसेंबर १९७३ यादिवशी त्यांनी तिथे मुक्काम ठोकला. याच दिवशी ‘लोक बिरादरी प्रकल्पा’च्या कामाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हते. ‘तू तुझ्या वेळेला ये मी कामाला सुरुवात करतो’ असे म्हणून ते तिथे पोहोचले, पण बाबांची इच्छा, काम उभारण्याची ओढ याच्याशी सरकारी कारभाराचा मेळ कसा बसणार? त्यामुळे हा प्रकल्प उभा करण्याच्या कामात सुरुवातीलाच विघ्न निर्माण झालं. हेमलकशाची जगा मूळ वनखात्याची होती. त्यांनी ती महसूलखात्याला दिली आणि महसूलखात्याने बाबांना म्हणजे ‘महारोगी सेवा समिती’ला दिली होती. ही जागा मिळाल्यामुळे नवा प्रकल्प उभारता येणार, या भावनेने बाबांना अगदी स्फूरण चढलं होतं. ज्या कार्यकर्त्याना घेऊन बाबा हेमलकशाला पोहोचले होते, त्यांच्या राहण्यासाठी वावरण्यासाठी जंगलातील काही जागा मोकळी करणं आवश्यक होतं. त्यामुळे बाबांनी तिथे जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली. झाड तोडली जात आहेत हे कळताच तिथे वनाधिकारी आले आणि त्यांनी “तुम्ही बेकायदा आमच्या जागेत कसे घुसलात? असा आक्षेप घेणं सुरु केलं. बाबा म्हणाले, “कागदोपत्री जागा माझी आहे त्यावर ते म्हणाले,” पण त्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही” ते ऐकेनात, त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. खरं तर बाबा थेट हेमलकशाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनाधिकाऱ्याला खटकलं होतं. आपल्याला त्यांनी आधी कल्पना द्यायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. थोडक्यात, त्याला महत्व न दिल्याने तो चिडला होता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथे होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढलां, “झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही त्यांच्याकडून वसूल करा” असं त्यांनी वनाधिकाऱ्याला सुचवलं. वनाधिकाऱ्याने ही सूचना स्वीकारली आणि तोडलेल्या झाडांची काही एक किमत ठरवली! तेवढी दिल्यानंतरच कुठे हे प्रकरण मिटलं. |
(१) (2)
- २३ डिसेंबर १९७३
- वनाधिकाऱ्याचा आक्षेप
(२) खालील कृती करा. (2)
- बाबा आमटे यांनी आपली ‘महारोगी सेवा समिती’ या जागेवर सुरुवात केली - ______
- अधिकारी, ज्याने वनखात्याच्या अडचणीतून मार्ग काढला - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)
माणूस, त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे, हा कर्मवीरांचा आग्रह होता. भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे. खेडी ही निसर्गाला अधिक जवळची आहेत. व्यक्तिचे पौरुष, प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून. कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळविला. संस्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा, वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला. पुढे-पुढे शाळांच्या वास्तू उभ्या राहिल्या. शक्य असेल तेथे शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली. शेतात विहिरी खोदण्यात आल्या. हे सर्व विदयार्थ्यांच्या श्रमदानातून घडवून आणले. अंगमेहनतच गरिबांची दौलत. ‘कमवा आणि शिका’ या शिक्षण-क्षेत्रातील मंत्राचे द्रष्टे कर्मवीर हेच होते. |
(2) चौकटी पूर्ण करा. (2)
- कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत - ______
- कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र - ______
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला. |
चौकटी पूर्ण करा.
अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू - ______, ______, ______, ______.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला. |
माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उताऱ्याच्या आधारे व तुमच्या मते स्पष्ट करा.
कमी वेळात, कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता? त्यांची यादी करा.
ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले विविध ॲप्स कोणते? त्यांचा वापर कसा करावा याविषयीची माहिती मिळवा.