Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)
माणूस, त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे, हा कर्मवीरांचा आग्रह होता. भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे. खेडी ही निसर्गाला अधिक जवळची आहेत. व्यक्तिचे पौरुष, प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून. कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळविला. संस्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा, वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला. पुढे-पुढे शाळांच्या वास्तू उभ्या राहिल्या. शक्य असेल तेथे शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली. शेतात विहिरी खोदण्यात आल्या. हे सर्व विदयार्थ्यांच्या श्रमदानातून घडवून आणले. अंगमेहनतच गरिबांची दौलत. ‘कमवा आणि शिका’ या शिक्षण-क्षेत्रातील मंत्राचे द्रष्टे कर्मवीर हेच होते. |
(2) चौकटी पूर्ण करा. (2)
- कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत - ______
- कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र - ______
उत्तर
(1)
(2)
- कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत - अंगमेहनत
- कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र - कमवा आणि शिका
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अपठित गद्य
प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा.
(i) रामेश्वरम बेटावरील इंग्रजी जाणणारा एकमेव माणूस -
(ii) कलाम याना वाचनासाठी उत्तेजन देणारे -
(iii) रामनाथपुरमला जाण्यासाठी वडिलांकडे परवानगी मागणारे -
(iv) रामेश्वरम येथील वर्तमानपत्रlचे वितरक -
जलालुद्दीन फारसा शिकला नाही पण त्याने अब्दुल कलामना मात्र शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले. रामेश्वरम बेटावर इंग्रजी जाणणारा तो एकटाच माणूस होता. त्यानेच अब्दुल कलामना नवनव्या वैद्यानिक शोधांबद्दल, साहित्याबद्दल, आधुनिक उपचारपद्धतीबद्दल ओळख करून दिली. त्यांच्या गावात एस. टी. आर माणिकन् नावाचे एक माजी क्राांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह होता. त्यांनी कलाम याना पुस्तक वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. शमसुद्दीन नावाच्या दूरच्या भावाचा कलामवर प्रभाव होता. तो रामेश्वरममध्ये वर्तमानपत्राचा वितरक होता. रेल्वेने पंबन गावाहून वर्तमानपत्राचे गठ्ठे येत. पुढे शमसुद्दीन त्याचे वाटप करी. दिनमणी हे सर्वात लोकप्रिय तमीळ वृत्तपत्र होते. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. चालत्या गाडीतून ते गठ्ठे फेकले जात. ते गोळा करण्याच्या कामात शमसुद्दीनला कलाम मदत करू लागला. अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई! दुसरे महायुद्ध संपल्यावर रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी, रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी कलामांनी वडिलांकडे परवानगी मागितली. वडील म्हणाले, ‘‘अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिकण्यासाठी बाहेर जायला हवे.’’ शमसुद्दीन आणि जलालुद्दीन कलामबरोबर रामनाथपुरमला गेले. कलामने कलेक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. जलालुद्दीन म्हणाला, ‘‘मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणत जा. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.’’
(२) परिणाम लिहा.
(i) दुसरे महायुद्ध पेटले.
(ii) कलाम वृत्त पत्रे गोळा करण्या च्या कामात मदत करू लागले.
(३) विशेषण-विशेष्य यांच्या जोड्या जुळवा.
(४) स्वमत - पाठाच्या आधारे आशावादी विचारांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) उतारा वाचून दिलेली कृती करा.
(१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.
(अ) वृक्ष बहरू लागले आहेत. ______
(आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. ______
(२) स्पष्ट करा.
(अ) पाणी समजूतदार वाटते ______
(आ) पाणी क्रूर वाटते ______
वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार? - राजा मंगळवेढेकर |
(आ) खालील आकृत्या पूर्ण करा.
(१) | ![]() |
(२) | ![]() |
(इ) तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांतील अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.
वाक्य | अव्यय | अव्ययाचा प्रकार |
(१) पाणी कुठे गच्चीवर लोळते. | ______, ______ | ______, ______ |
(२) पाणी येते आणि जाते. | ______ | ______ |
- उताऱ्यातून कळलेला ‘पाण्याचा स्वभाव’ तुमच्या शब्दांत लिहा.
- वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)
आकलन कृती
१. उत्तर लिहा. (०२)
- ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
- फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो?
पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते. नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य! या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात. |
२. आकलन कृती
१. पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (०२)
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)
आकलन कृती
१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
- परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
- झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.
चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. |
२. आकलन कृती
१. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२)
- पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______
- हृदयाला आनंद बहाल करणारा ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)
आकलन कृती
१. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
i. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात. (०१)
अ) कारण ते आधी दुसऱ्याचा विचार करतात नंतर स्वत:चा विचार करतात.
ब) कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात.
क) त्यांच्या दृष्टीने नातं ही एका अंतरावरली गोष्ट असते.
ड) त्यांच्या दृष्टीने नातं अवकाश देणारे असावे.
ii. आपल्या दृष्टीने नातं ही एक ______ (०१)
अ) गुंतलेली गोष्ट असते.
ब) विखुरलेली गोष्ट असते.
क) अंतरावरील गोष्ट असते.
ड) आपल्यासाठी सोईची गोष्ट असते.
दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बऱ्याचदा आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो. |
२. आकलन कृती
१. वैशिष्ट्ये लिहा. (०२)
खऱ्या नात्यामधील संवेदना
- ______
- ______
- ______
- ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे. |
1. योग्य जोड्या लावा. (2)
'अ' गट | 'ब' गट | |
i. | सूर्य | पाणी |
ii. | मेघ | वस्त्र |
iii. | शेतकरी | प्रकाश |
iv. | विणकर | धान्य |
2. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)
- आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला - ______
- आपले पोषण करणारी - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) उत्तर लिहा. (२)
- ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
- फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो?
पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते. नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य! या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात. |
२) पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (२)
←नव्या पिढीला माणूसपणाच्या सुंदरतेकडे नेणारे→ |
उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
१. आकृती पूर्ण करा. (२)
आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, राहण्यासाठी झोपड्या बांधणे. अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले. अर्थात् ही प्रक्रिया सोपी नव्हती अनेक अडचणी होत्या. पण त्यावर मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले, त्यांना निवास उपलब्ध करून दिला. शिवाय त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर हास्य उमलले. हे हास्य समाधानाचे, आत्मविश्वासाचे होते. बोटं झडलेल्या थिट्या हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा. लाभावा यासाठी ‘आनंदवनाची’ धडपड असते. आनंदवन उभारताना बाबांनी आतोनात कष्ट घेतल त्यामुळेच गेली सहा दशके तिथे महारोगाने, अंधत्वाने, अपंगत्वाने झाकोळून गेलेली जीवने उजळून निघाली. जन्माला येतानाच उपेक्षा घेऊन आलेल्या जीवांमध्ये ‘सुंदर मी होणार’ यासोबत ‘सुंदर मी करणार’ हा मंत्र आनंदवनने जोपासला. |
२. योग्य जोड्या लावा: (२)
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(i) भंगलेली | (i) भाकर |
(ii) खचलेली | (ii) जीवने |
(iii) कष्टाने मिळवलेली | (iii) मने |
(iv) झाकोळलेली | (iv) शरीरे |
३. व्याकरण:
(i) खालील वाक्यांतील विशेषणे शोधून लिहा: (१)
(अ) त्यांना ताठ मनाने जगण्याची प्रेरणा मिळाली.
(ब) त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.
(ii) खालील सर्वनामांचा वाक्यात उपयोग करा: (१)
(अ) तू
(ब) तुझा
४. स्वमत: (२)
‘सुंदर मी करणार’ या आनंदवनाने जोपासलेल्या मंत्राचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. योग्य जोड्या लावा. (2)
‘अ’ गट | ‘ब’ गट | |
(i) | शेती | प्रकाश |
(ii) | सूर्य | वस्त्र |
(iii) | वृक्ष | हंगाम |
(iv) | पैठणी | ओंबी |
(v) | भात | पाने |
शेतीभातीचे ते दिवस व कापणीचा हंगाम, अगोदरच त्या गावाला झाडी अतोनात, तशात प्रातःकाळचा तो वेळ, सूर्य नुकताच वर आला होताच त्याचे कोवळे ऊन पावसाने आपल्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून टवटवीत केलेल्या वृक्षांची हिरवीगार पाने अधिक सतेज दिसत होती. सभोवार कणसांवर आलेली विस्तीर्ण शेतेच दृष्टीस पडत होती. आमच्या पायांपासून तो थेट समोरच्या डोंगरापर्यंत पिवळसर हिरव्या रंगाचे गालिचेच पसरले आहेत की काय असा भास होई. मधून-मधून नाचण्यांची हिरवीगार शेत दिसत, त्यामुळे असा भास होई की, सृष्टिदेवी हिरव्या बुट्टयांनी युक्त अशी पिवळी पैठणीच नेसून विहार करीत आहे. आत दाणा झाल्याकारणाने शेतातील भाताच्या ओंब्या अगदी वाकून गेल्या होत्या. नाना तऱ्हेचे व चित्रविचित्र रंगांचे पक्षी मंजूळ गायन करीत इकडून-तिकडे उडून जाताना दृष्टीस पडत आणि शेतामधून काम करणारी माणसेही मधून-मधून दिसत, शीतल व सुवासिक फुलांच्या वासाने सुगंधित असा वारा झुळझुळ वाहत होता. तो शेतावरून वाहताना समुद्रावर वर खाली होणाऱ्या लाटांप्रमाणे त्या शेतांची शोभा दिसत होती. वारा लागून त्या ओंब्याचा जो सळसळ आवाज होई तो किती मनोहर! |
२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)
- पायापासून डोंगरापर्यंत पसरलेले पिवळसर हिरव्या रंगाचे - ______
- मंजूळ गायन करणारे - ______
(१) उतारा वाचून त्यावरील कृती करा.
(अ) वैशिष्ट्ये लिहा.
विद्वत्ता कोणाकडेही असो ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल-खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने-वर्षे लागतात; परंतु जेवढी खोल मुळे असतात, तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो. तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्त्व असेल. आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे, की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे ठरवायचे आहे. विद्वत्ता ही अशी बाब आहे, जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही; पण एकदा ती तुमच्याजवळ आली, की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते, सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विद्वत्ता तुम्हांला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते. |
(आ) खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा.
घटना/कृती | परिणाम |
(१) झाडाची मुळे खोल जाणे. | (१) ____________ |
(२) प्रयत्नांनी विद्या मिळवणे. | (२) ____________ |
(इ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(१) विजेसारखे चमकणे -
(२) सूर्यासारखे प्रकाशणे -
(२) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
(१) संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिपून जाईल.
(३) व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. योग्य जोड्या लावा. (2)
‘अ’ गट | ‘ब’ गट | |
(i) | हिरा | विद्वान |
(ii) | शिल्पकार | श्रोतृगण |
(iii) | विषयतज्ज्ञ | खाण |
(iv) | भाषण | प्रबुद्ध |
(v) | प्रौढ | शिल्पकला |
मनुष्याच्या अंगी कोणताही गुण असला तरी परिश्रमाखेरीज व अभ्यासाखेरीज त्याचे तेज कधीही पडावयाचे नाही. खाणीतून नुकताच खणून काढलेला हिरा जसा मुळात तेजस्वी नसून शिल्पकारांच्या संस्कार प्रयोगांची त्याला खास अपेक्षा असते त्याचप्रमाणे गुणीजनांच्या अंगी असणारी कलाही शिक्षणाखेरीज पूर्वत्वाने कधी प्रकट होत नसते. असो, तर वक्तृत्व हे जरी मनुष्याच्या अंगी जन्मसिद्धच असले पाहिजे, तरी ते तसे कोणाचे ठायी असतानाही विद्वत्तेखेरीज ते पूर्ण शोभा कधीही द्यावयाचे नाही. विद्वान व रसिक लोकांना तुष्ट करून त्यांची मते आपल्या भाषणाने ज्यास वळवावयाची असतील त्याने भाषाशुद्धता, अर्थसंगती, सुंदर व प्रौढ विचार मोठमोठया नामांकित काव्यांचे, नाटकांचे व इतिहासाचेही ज्ञान संपादन करून त्याच्याशी त्याने सतत परिचय केला पाहिजे. याखेरीज इतर अनेक विषयांची माहिती त्याला असली तर चांगलीच कारण दृष्टान्त वगैरे देण्यास व भाषणास वैचित्रय व मनोरंजकता आणण्यास ती फार उपयोगी पडते. आणखी एक प्रभावी साधन म्हणजे अनुकरण. कोणताही गुण साध्य करून घेण्यास अनुकरणासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. |
२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)
- गु्णीजनांच्या अंगी असणारी कलेला अपेक्षा असते - ______
- खाणीतून निघणारे - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. योग्य जोड्या लावा. (2)
‘अ’ गट | ‘ब’ गट | |
(i) | चंदीपूर | चेन्नई |
(ii) | अण्वस्त्र चाचण्या | शिक्षणाची सोय |
(iii) | अण्णा युनिव्हर्सिटी | ओरिसा |
(iv) | खेड्यापाड्यात | जावेद मियाँदाद |
(v) | लहान पोरगा | डॉ. कलाम |
त्या भेटीनंतर कधीही चेन्नईला जाण्याचा योग आला, की मी अण्णा युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांची गाठ घेत असे. ते तेथे अध्यापन करत असत. आम्ही तेव्हा अनेक विषयांवर बोलत असू; परंतु आमच्या बोलण्याचा मुख्य विषय म्हणजे- खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची सुविधा कशी पोहोचवायची, हाच असे. श्री. कलाम यांना आपल्या स्वतःच्या शिक्षकांविषयी नितांत आदर आहे, त्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी कमालीची कृतज्ञता आहे. मी एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले असताना चंदीपूरमध्ये जावेद मियाँदाद नावाच्या एखादा लहानशा कोळ्याच्या पोराकडून आयुष्यातील फार मोठं चिरंतन सत्य शिकले होते. जावेदने मला सांगितले होतं- ‘गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जाणं केव्हाही उत्तम.’ या अनुभवाविषयी मी कलाम यांना सांगत होते. कलाम यांनी त्याचे हे उद्गार ताबडतोब एका चिट्ठीवर लिहून घेतले आणि म्हणाले, “केवढा मोठा विचार हा!” ओरिसा हे त्यांचं अत्यंत आवडतं राज्य असल्याचं त्यांनीच मला सांगितलं, अण्वस्त्र चाचण्यांसाठी आयुष्यातील वीस वर्षे ते ओरिसातच राहिले होते. “तुम्ही जर ओरिसामध्ये कोणताही समाजकार्याचा उपक्रम हाती घेतलात, तर त्यासाठी मी जरूर येईन,” ते म्हणाले. तुम्ही तिथे बरचं काम करता आणि ओरिसा या राज्याविषयी तुम्हांलासुद्धा पुष्कळ आपुलकी आहे. याची मला कल्पना आहे. |
२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)
- ओरिसा, हे यांचे आवडते राज्य होते - ______
- लेखिकेला ओरिसा राज्याविषयी वाटणारी - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)
दारावर कुणी भिक्षा मागण्यास आला, तर आई त्याला भिक्षा घालत असे. एके दिवशी एक धडधाकट भिकारी आला असता रुक्मिणीबाई त्याला भिक्षा घालू लागल्या. विनोबा त्यांना म्हणाले, “हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना जर भिक्षा देत गेलो, तर देशात आळस वाढेल. अपात्राला दान केले, तर त्यामुळे दान देणाऱ्याचेही अकल्याण होते.” रुक्मिणीबाईंनी ते शांतपणे ऐकले आणि म्हणाल्या, “विन्या, पात्र-अपात्र यांची परीक्षा करणारे आम्ही कोण? दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्वररूप समजून त्याला शक्तिनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण”? विनोबांनी त्यावर टिपणी केलीय, की ‘आईच्या या युक्तिवादावर विन्याला दुसरा, युक्तिवाद सुचला नाही.’ |
(2) जोड्या लावा. (2)
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(i) दारावर भिक्षा मागायला येणारा | (1) रुक्मिणीबाई |
(ii) भिकाऱ्याला भिक्षा घालणाऱ्या | (2) विनोबा |
(iii) आईच्या युक्तिवादावर टिपणी करणारे | (3) भिक्षेकरी |
(iv) मुलाचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेणाऱ्या | (4) रुक्मिणीबाई |
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे - (२)
(य) ______
(र) ______
मी वेड्यासारखी समुद्र पाहत राहायची. कधी सकाळी तर कधी चांदण्यारात्री, पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा. कसं थंड, शांत वाटायचं. मनातले सगळे विकल्प लयाला गेले असायचे. अवघं अस्तित्व निरामय होऊन जायचं. आपण आणि हा अथांग पसरलेला समुद्र! बाकीची जाग-जाण मिटलेली असायची. अशी अभूतपूर्व शांतता मी पूर्वी कधी अनुभवलेली नव्हती. मुरुडच्या समुद्रानं मला बांधून ठेवलं. मी लिहायला लागले त्यामागे या मुरुडच्या समुद्राची फार मोठी प्रेरणा आहे. पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे महत्त्वाकांक्षा, यश आणि आत्मविश्वासाचं प्रतीक वाटायच्या, तर मागे मागे सरकणाऱ्या लाटा म्हणजे पराभव, अपयश, मानहानी पचवणारी शक्ती. समुद्राच्या पोटात किती काय काय दडलं असेल! त्यानं किती पचवलं असेल, किती सहन केलं असेल. माणसाच्या मनाचं मला ते दुसरं रूप वाटायचं, समुद्राशी माझा संवाद चालायचा. - गिरिजा किर |
(२) ‘पाण्यावर सांडलेलं चांदण पाहिलं’ की लेखिकेची होणारी भावावस्था - (२)
(य) ______
(र) ______
कमी वेळात, कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता? त्यांची यादी करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रदधा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. |
- आकृतिबंध पूर्ण करा: (2)
- टीप लिहा: (2)
स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. आकृतिबंध पूर्ण करा: (2)
मातेचा महिमा मी किती सांगू किती गाऊ ? मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी. मुलांसाठी तिचा जीव. मुलांसाठी ती वाटेल ते करील. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही. बसणार नाही. तिला कोठे काहीही मिळो, स्वत:च्या लेकरांसाठी ती ते घेऊन येईल. मुलाचे जरा काही दुखले - खुपले, की ती कावरी - बावरी होते. आई ! ह्या दोन अक्षरांत साऱ्या श्रृतिस्मृती आहेत. सारी महाकाव्ये आहेत. ह्या दोन अक्षरांत माधुर्याचा सागर आहे, पावित्र्याचे आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल, तर आईजवळ क्षणभर बसा. सारे तुम्हाला मिळेल. |
2. कधी ते लिहा: (2)
- आई कावरीबावरी होते - ______
- आई थकणार नाही - ______