Advertisements
Advertisements
प्रश्न
चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मन:स्थिती, याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
दीर्घउत्तर
उत्तर
चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला. तो त्याने भिरकावताच चेंडूसारखा उड्या मारत लांब थांबला; तेव्हा राजुला आश्चर्य वाटले. तो दगड त्याने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला. या घटनेची राजूला भीतिमिश्रित गंमत वाटली. सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला. लहान व मोठे धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले. राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला. जेव्हा शिक्षक व मित्रांनी त्याचे म्हणणे टाळले, तेव्हा तो निराश झाला. त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला. राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला आनंद झाला.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?