हिंदी

चूक की बरोबर सकार लिहा. राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चूक की बरोबर सकार लिहा.

राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.

खालील विधान 'बरोबर' की 'चूक' ते सकारण सांगा.

लोकायुक्त राजकीय कार्यकारी प्रमुखांविरेधात चौकशी करू शकतात.

विकल्प

  • चूक 

  • बरोबर

MCQ
सत्य या असत्य

उत्तर

वरील विधान बरोबर आहे.
कारणे:

द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट २०१३ हा कायदा २०१४ मध्ये लागू झाला. या कायद्यान्वये केंद्रासाठी ‘लोकपाल’ तर राज्यांसाठी ‘लोकायुक्त’ या संस्थांची स्थापना करण्यात आली. हे कार्यालय शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांची चौकशी करू शकते. यातून शासनाची स्वच्छ आणि प्रतिसाद देणाऱ्या प्रशासनाविषयीची कटिबद्धता दिसून येते.

महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे लोकायुक्त ही संकल्पना राबवली गेली आहे. १९७२ साली महाराष्ट्र लोकायुक्त संस्था अस्तित्वात आली. कार्यकारी मंडळ सदस्य, कायदेमंडळ सदस्य, राज्य सरकार, स्थानिक शासन संस्था, सार्वजनिक उद्योग आणि इतर शासकीय संस्थामधील अधिकारी अशा सार्वजनिक कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे काम लोकायुक्त करतात. सर्वसामान्य लोक सर्व प्रकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्याच विरोधातील आरोपांची चौकशी लोकायुक्तांकडे करू शकतात.

shaalaa.com
भारतातील प्रशासकीय सुधारणा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: समकालीन भारत : सुशासन - स्वाध्याय [पृष्ठ ५८]

APPEARS IN

बालभारती Political Science [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
अध्याय 5 समकालीन भारत : सुशासन
स्वाध्याय | Q २ (ब) (१) | पृष्ठ ५८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×