Advertisements
Advertisements
प्रश्न
चूक की बरोबर सकार लिहा.
राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.
खालील विधान 'बरोबर' की 'चूक' ते सकारण सांगा.
लोकायुक्त राजकीय कार्यकारी प्रमुखांविरेधात चौकशी करू शकतात.
पर्याय
चूक
बरोबर
उत्तर
वरील विधान बरोबर आहे.
कारणे:
द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट २०१३ हा कायदा २०१४ मध्ये लागू झाला. या कायद्यान्वये केंद्रासाठी ‘लोकपाल’ तर राज्यांसाठी ‘लोकायुक्त’ या संस्थांची स्थापना करण्यात आली. हे कार्यालय शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांची चौकशी करू शकते. यातून शासनाची स्वच्छ आणि प्रतिसाद देणाऱ्या प्रशासनाविषयीची कटिबद्धता दिसून येते.
महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे लोकायुक्त ही संकल्पना राबवली गेली आहे. १९७२ साली महाराष्ट्र लोकायुक्त संस्था अस्तित्वात आली. कार्यकारी मंडळ सदस्य, कायदेमंडळ सदस्य, राज्य सरकार, स्थानिक शासन संस्था, सार्वजनिक उद्योग आणि इतर शासकीय संस्थामधील अधिकारी अशा सार्वजनिक कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे काम लोकायुक्त करतात. सर्वसामान्य लोक सर्व प्रकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्याच विरोधातील आरोपांची चौकशी लोकायुक्तांकडे करू शकतात.
संबंधित प्रश्न
लोकपाल ही संकल्पना ______ या देशाकडून घेण्यात आली.
नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे -
योग्य संकल्पना सुचवा.
शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-
तुमचे मत नोंदवा.
ई−प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली.
तुमचे मत नोंदवा.
ई-प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे.