Advertisements
Advertisements
प्रश्न
दैनंदिनी (डायरी) तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून तिचे आत्मकथन पुढील मुद्द्यांचा उपयोग करून लिहा.
- निर्मिती
- महत्त्व
- उपयोग
- इतरांची भावना
- आनंद
- खंत
उत्तर
मी दैनंदिनी बोलतेय...
आजुबाजूला सगळ्या वह्यांचा पसारा पडला होता. गेल्या आठवड्यात गणिताचे एक नवे सूत्र शिकले होते. कुठल्या वहीत लिहून ठेवले हे आठवत नव्हते. तेवढ्यात एक आवाज आला, “मला माहित आहे तु काय शोधत आहेस, सूत्र शोधतेस ना? मी ते नीट जपून ठेवले आहे.'' मी इकडे तिकडे पाहिले. “अग, मी दैनंदिनी बोलतेय...” टेबलावरची दैनंदिनी माझ्याशी बोलत होती.
कुठल्यातरी एका मोठ्या कारखान्यात माझा जन्म झाला. शाळा सुरु होण्याच्या काही दिवसापूर्वी तु मला घरी घेऊन आलीस. आनंदाने सगळ्यांसोबत माझी ओळख करून दिलीस. मीही आनंदून फुलुन गेले. दिवसभरातल्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद स्वत:जवळ ठेवायचे काम मी मनापासून करते.
दररोज वेगवेगळे अनुभव तुम्ही घेत असता. या अनुभवांतून तुम्ही तुमच्या विचारांची दिशा ठरवता. यातूनच प्रेरणा मिळत असतात. पण हे सगळं एका वेळी डोक्यात साठवलं जाऊ शकत नाही. महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या जाऊ शकतात. अशा वेळी तुम्ही माझी मदत घेत असतात. जे जे अनुभवता ते ते माझ्याजवळ ठेवता. हे सर्व काही जपून ठेवणे मला माझे कर्तव्य वाटते.
आजवर बऱ्याच मोठमोठ्या व्यक्तींनी माझे महत्त्व जाणले. माझा योग्य उपयोग केला. त्यांच्यानंतरही माझ्या मदतीने महत्त्वाची माहित हाती येऊ शकली. माझ्या मदतीमुळे बुद्धिमत्तेचा उपयोग जगाला होऊ शकला.
शास्त्रज्ञ, लेखक, समाजसेवक इत्यादी मंडळी माझ्यावर फार जीव लावतात. त्यांच्या रोजच्या जीवनातील अनुभव ते मला सांगतात. माझ्या पानांना जपतात. कधीच फाडत नाहीत. चुरगळत नाहीत. आता हेच बघ नं, तू पण किती सांभाळतेस मला!
दिवसभरातल्या घडामोडी, महत्त्वाच्या घटनांची तुम्ही माझ्या-जवळ नोंद करता. कधी कधी मनातली काही गुपिते न लपवता मला सांगता. तुमच्या आवडीनिवडींबद्दल माझ्याशी बोलता. या सगळ्यात मला माझेच कौतुक वाटते. माझे आयुष्य तुमच्यासाठी आहे, याचे मनोमन समाधान वाटते.
मी तुमच्या मनातली दैनंदिनी बनते. तुमच्या आनंदात, दु:खात मी तुमच्या सोबत राहते. तुमची जवळची सखी बनते. जणू तुमच्या मनाचा मी आरसा असते. असे असले तरी एका गोष्टीचे फार वाईट वाटते. आपली सोबत केवळ एक वर्षाची असते. वर्ष संपले की तुम्ही नवी दैनंदिनी घेऊन येता. हळूहळू जुन्या दैनंदिनीचा विसर पडतो. असो.
यानंतर आवाज थांबला होता. मी पटकन टेबलवरची दैनंदिनी उचलली. आणि त्यात गणिताचे सूत्र खरच दैनंदिनीने जपून ठेवले होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मेरा देश भारत विषय पर 200 शब्दों का निबंध लिखिए।
‘पुस्तक प्रदर्शनी में एक घंटा’ विषय पर अस्सी से सौ शब्दों में निबंध लेखन कीजिए।
‘हमारी सैर’ विषय पर निबंध लिखिए।
'यदि मैं बादल होता......' विषय पर लगभग सौ शब्दों में निबंध लिखिए |
बढ़ते हुए प्रदुषण (वायु, ध्वनि) का स्वास्थ पर बुरा असर पड़ रहा है, विषय पर अपने विचार लिखिए |
‘मैं प्रकृति बोल रही हूँ’ विषय पर निबंध लेखन कीजिए।
‘मेरी अविस्मरणीय सैर’ विषय पर अस्सी से सौ शब्दों में निबंध लिखिए।
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
नदी की आत्मकथा
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
यदि मैं अध्यापक होता .....
निम्नलिखित विषय पर लगभग 70 से 80 शब्दों में निबंध लिखिए:
समय का सदुपयोग
निबंध लिखिए:
वृक्षारोपण
निबंध लिखिए:
सफलता
निबंध लिखिए -
जल संचयन
निम्नलिखित विषय पर लगभग 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए।
ऑनलाइन या ई-लर्निंग और विद्यार्थी
निबंध लिखिए:
मोबाइल शाप या वरदान
निम्नलिखित विषय पर लगभग 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
फटी पुस्तक की आत्मकथा
‘करत-करत अभ्यास के जड़मति होत सुजान’ इस विषय पर भाषाई सौंदर्यवाले वाक्यों, सुवचन, दोहे आदि का उपयोग करके निबंध/कहानी लिखिए ।
‘यदि मैं शिक्षा मंत्री होता -----’ विषय पर लगभग सौ शब्दों में निबंध लिखिए।