English

दैनंदिनी (डायरी) तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून तिचे आत्मकथन पुढील मुद्‌द्यांचा उपयोग करून लिहा. निर्मिती महत्त्व उपयोग इतरांची भावना आनंद खंत - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

दैनंदिनी (डायरी) तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून तिचे आत्मकथन पुढील मुद्‌द्यांचा उपयोग करून लिहा.

  1. निर्मिती
  2. महत्त्व
  3. उपयोग
  4. इतरांची भावना
  5. आनंद
  6. खंत
Long Answer

Solution

मी दैनंदिनी बोलतेय...

आजुबाजूला सगळ्या वह्यांचा पसारा पडला होता. गेल्या आठवड्यात गणिताचे एक नवे सूत्र शिकले होते. कुठल्या वहीत लिहून ठेवले हे आठवत नव्हते. तेवढ्यात एक आवाज आला, “मला माहित आहे तु काय शोधत आहेस, सूत्र शोधतेस ना? मी ते नीट जपून ठेवले आहे.'' मी इकडे तिकडे पाहिले. “अग, मी दैनंदिनी बोलतेय...” टेबलावरची दैनंदिनी माझ्याशी बोलत होती.

कुठल्यातरी एका मोठ्या कारखान्यात माझा जन्म झाला. शाळा सुरु होण्याच्या काही दिवसापूर्वी तु मला घरी घेऊन आलीस. आनंदाने सगळ्यांसोबत माझी ओळख करून दिलीस. मीही आनंदून फुलुन गेले. दिवसभरातल्या महत्त्वाच्या गोष्टींची नोंद स्वत:जवळ ठेवायचे काम मी मनापासून करते.

दररोज वेगवेगळे अनुभव तुम्ही घेत असता. या अनुभवांतून तुम्ही तुमच्या विचारांची दिशा ठरवता. यातूनच प्रेरणा मिळत असतात. पण हे सगळं एका वेळी डोक्यात साठवलं जाऊ शकत नाही. महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या जाऊ शकतात. अशा वेळी तुम्ही माझी मदत घेत असतात. जे जे अनुभवता ते ते माझ्याजवळ ठेवता. हे सर्व काही जपून ठेवणे मला माझे कर्तव्य वाटते.

आजवर बऱ्याच मोठमोठ्या व्यक्तींनी माझे महत्त्व जाणले. माझा योग्य उपयोग केला. त्यांच्यानंतरही माझ्या मदतीने महत्त्वाची माहित हाती येऊ शकली. माझ्या मदतीमुळे बुद्धिमत्तेचा उपयोग जगाला होऊ शकला. 

शास्त्रज्ञ, लेखक, समाजसेवक इत्यादी मंडळी माझ्यावर फार जीव लावतात. त्यांच्या रोजच्या जीवनातील अनुभव ते मला सांगतात. माझ्या पानांना जपतात. कधीच फाडत नाहीत. चुरगळत नाहीत. आता हेच बघ नं, तू पण किती सांभाळतेस मला!

दिवसभरातल्या घडामोडी, महत्त्वाच्या घटनांची तुम्ही माझ्या-जवळ नोंद करता. कधी कधी मनातली काही गुपिते न लपवता मला सांगता. तुमच्या आवडीनिवडींबद्‌दल माझ्याशी बोलता. या सगळ्यात मला माझेच कौतुक वाटते. माझे आयुष्य तुमच्यासाठी आहे, याचे मनोमन समाधान वाटते.

मी तुमच्या मनातली दैनंदिनी बनते. तुमच्या आनंदात, दु:खात मी तुमच्या सोबत राहते. तुमची जवळची सखी बनते. जणू तुमच्या मनाचा मी आरसा असते. असे असले तरी एका गोष्टीचे फार वाईट वाटते. आपली सोबत केवळ एक वर्षाची असते. वर्ष संपले की तुम्ही नवी दैनंदिनी घेऊन येता. हळूहळू जुन्या दैनंदिनीचा विसर पडतो. असो.

यानंतर आवाज थांबला होता. मी पटकन टेबलवरची दैनंदिनी उचलली. आणि त्यात गणिताचे सूत्र खरच दैनंदिनीने जपून ठेवले होते.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: उपयोजित लेखन - लेखन कौशल्य [Page 52]

APPEARS IN

Balbharati Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 15 उपयोजित लेखन
लेखन कौशल्य | Q आत्मकथन | Page 52

RELATED QUESTIONS

मेरा देश भारत विषय पर 200 शब्दों का निबंध लिखिए।


‘यदि मेरा घर अंतरिक्ष में होता,’ विषय पर अस्‍सी से सौ शब्‍दों में निबंध लेखन कीजिए ।


वैचारिक निबंध: अकाल: एक भीषण समस्या


कल्पनाप्रधान निबंध: यदि किताबें न होतीं


चरित्रात्मक निबंध: मेरे आदर्श


आत्मकथात्मक निबंध: भूमिपुत्र की आत्मकथा


निम्नलिखित विषय पर 200 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए:

दुर्घटना से देर भली


निम्नलिखित विषय पर 60 - 70 शब्दों में निबंध लिखिए:

मोबाइल की उपयोगिता


निबंध लेखन -

एक बाढ़ पीड़ित की आत्मकथा


निबंध लेखन -

मेरा प्रिय खिलाड़ी


निबंध लिखिए:

मेरे प्रिय साहित्यकार


निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।

मैच खेलने का अवसर


निबंध लिखिए-

आवश्यकता ही आविष्कार की जननी है।


निम्नलिखित विषय पर लगभग 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:

पर्यावरण सुरक्षा में पक्षियों की भूमिका


‘मैं लाल किला बोल रहा हूँ...’ निबंध लिखिए।



रामवृक्ष बेनीपुरी द्‍वारा लिखित ‘गेंहूँ बनाम गुलाब’ निबंध पढ़िए और उसका आकलन कीजिए ।


निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:

यदि पुस्तकें न होती........


वर्णनात्मक -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×