English

खालील मुद्‌द्यांच्या आधारे ‘मी अनुभवलेला पाऊस’ या विषयावर निबंध लिहा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील मुद्‌द्यांच्या आधारे ‘मी अनुभवलेला पाऊस’ या विषयावर निबंध लिहा.

Long Answer

Solution

मी अनुभवलेला पाऊस

जून महिना सुरू झाला होता. उन्हाचा त्रास कमी झाला होता. तरीही अजून उकाडा जाणवत होता. शहरातील डांबरी रस्त्यांवरून उष्णतेची तीव्रता जाणवत होती. सर्वांच्या मनाला वेध लागले होते. पावसाचे! माणसांप्रमाणेच पशुपक्षी, झाडे देखील पावसाची आतुरतेने वाट बघत होते. 

अचानक एके दिवशी दुपारी अंधार पडला. थंडगार वारा वाहू लागला. बघता बघता झुळूक सोसाट्याच्या वाऱ्यात बदलली. परिसरातील धूळ वाऱ्याबरोबर उडू लागली. आकाशात काळे ढग जमा झाले होते. आम्हाला काही कळायच्या आतच पाऊस जोरात कोसळू लागला. मातीचा गंघ दरवळला. सर्वांच्या ओठांत एकच धून घुमली, “पाऊस आला !' क्षणात वातावरण आनंदून गेले.

थेंबांचा वेग वाढला. सरीवर सरी बरसू लागल्या. ढगांचा गडगडाट झाला आणि विजांचा कडकडाट होऊ लागला. अचानक आलेला पाऊस संध्याकाळ झाली तरी बरसतच होता. कामावरून घरी परतणाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. छत्री व रेनकोट कुणाकडेच नसल्याने काहीजण भिजत भिजत परतत होते. आज पावसाने खोडकर मुलांप्रमाणे सगळ्यांवर चाल खेळली. अंगणात दोरीवरून कपडे उतरवत असताना शेजारच्या काकू पावसाने भिजल्या. तरीही पावसाबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता होती. लहान मुले “पाऊस आला मोठ्ठा ' असं भिजत भिजत म्हणत होती. झाडांच्या पानांवरची धूळ साफ झाली होती. पाने चकाकू लागली होती. धरती न्हाऊन निघाली होती. उन्हामुळे हैराण झालेले सर्व सुखावले होते.

सृष्टीत झालेला हा बदल मला खूप आवडला. पावसाने माझे मन सुखावले. उत्साह जाणवू लागला होता. निसर्गदेखील चेतन्याने फुलून आला होता. संध्याकाळी उशिरा कधीतरी पाऊस थांबला. पावसाने आज नव्या क्रतूची सुरुवात केली होती. असा हा जादुगार पाऊस सर्वांवर आनंदाची बरसात करून गेला होता.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: उपयोजित लेखन - लेखन कौशल्य [Page 52]

APPEARS IN

Balbharati Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 15 उपयोजित लेखन
लेखन कौशल्य | Q वर्णनात्मक | Page 52

RELATED QUESTIONS

‘विश्वबंधुता वर्तमान युग की माँग’ विषय पर अस्‍सी से सौ शब्‍दों में निबंध लिखिए।


‘हमारी सैर’ विषय पर निबंध लिखिए।


कल्पनाप्रधान निबंध: यदि किताबें न होतीं


चरित्रात्मक निबंध: मेरे आदर्श


बढ़ते हुए प्रदुषण (वायु, ध्वनि) का स्वास्थ पर बुरा असर पड़ रहा है, विषय पर अपने विचार लिखिए |


‘बुरी संगति किसी को भी दिशाहीन बना सकती है’ इसपर तर्क सहित अपने विचार लिखिए।


‘मेरा प्रिय कवि/लेखक’ विषय पर सौ शब्‍दों में निबंध लिखिए।


‘वर्तमान समय में शांति के क्षेत्र में/पर्यावरण संरक्षण में भारत की भूमिका का महत्‍त्‍व’ विषय पर अस्‍सी से सौ शब्‍दों में निबंध लेखन कीजिए।


निम्नलिखित विषय पर 200 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए:

दुर्घटना से देर भली


निम्नलिखित विषय पर 200 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए:

जिन्हें जल्दी थी, वे चले गए


निबंध लिखिए:

घायल सैनिक की आत्मकथा


नीचे दिए गए अप्रत्याशित विषय पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।

लोकतंत्र में मीडिया की भूमिका


निबंध लिखिए -

श्रष्टाचार


निम्नलिखित विषय पर लगभग 120 शब्दों में लघुकथा लिखिए।

एक वीर सिपाही का सपना


निबंध लिखिए-

यदि इंटरनेट (अंतरजाल) न होता....


निबंध लिखिए-

विद्यार्थी और अनुशासन


निम्नलिखित विषय पर लगभग (80-100) शब्दों में निबंध लिखिए।

स्वच्छता


‘प्रदूषण मुक्‍त त्‍योहार’ इस विषय पर निबंध लिखिए।


‘यदि मैं शिक्षा मंत्री होता -----’ विषय पर लगभग सौ शब्‍दों में निबंध लिखिए।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×