English

दिलेल्या कथेचा शेवट वाचा व त्याच्या आधारे कथेची सुरुवात लिहा. ______ शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या कथेचा शेवट वाचा व त्याच्या आधारे कथेची सुरुवात लिहा.

____________________________________________________________

____________________________________________________________

____________________________________________________________

____________ शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. त्याच पाण्याने घासलेल्या भांड्यांची पहिली राख धुऊन टाकायची, खरकटी भांडी विसळायची, मळकट हात धुवायची, मग बादलीतले पाणी वाफ्यात ओतायची. वाफ्यातल्या भाज्या, फुलझाडे बहरून यायची. हिरवी माया फुलली, भोळ्याभाबड्या शेतकरणीने चतुरपणाने पाण्याचा थेंब नि थेंब जपला होता.

Answer in Brief

Solution

शांता ही गावातली अतिशय काबाडकष्ट करणारी शेतकरीण होती. ती दिवसभर शेतात काम करीत असे. एका वर्षी पाऊस खुपच कमी पडला. पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. गावापासून दूरवर झरा होता. तिथून पाणी आणावे लागत होते. झऱ्याचे पाणीही आता आटायला आले होते. गावापुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. शांतादेखील चिंतेत होती. शांताला पाण्याचे किती महत्त्व आहे हे माहीत होते. ती कधीच पाणी वाया जाऊ देत नसे. हीच शिकवण तिने मुलांना दिली होती.
गावापुढे पाण्याचा मोठाच प्रश्‍न होता. गावाजवळ पाण्याची दुसरी कोणतीच सोय नव्हती. पाणी फार काटकसरीने वापरावे लागणार होते. गावातील इतर शेतकरी यावर विचार करू लागले. हुशार शांताने एक योजना शोधून काढली. दिवसभर करावयाची कामे व त्यासाठी लागणारे पाणी हे गणित शांताने सोडवले होते. शांता शेतकरीण सकाळी लवकर उठून झऱ्यावर जात असे. मुलांच्या मदतीने दिवसभर पुरेल एवढे पाणी भरत असे. पाण्याच्या वापराचे तिने नियोजन केले होते. शांताच्या योजनेचे सर्वांनी स्वागत केले. शांताचे हे नियोजन गावकऱ्यांनीही सुरू केले. शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. त्याच पाण्याने घासलेल्या भांड्यांची पहिली राख धुऊन टाकायची, खरकटी भांडी विसळायची, मळकट हात धुवायची, मग बादलीतले पाणी वाफ्यात ओतायची. वाफ्यातल्या भाज्या, फुलझाडे बहरून यायची. हिरवी माया फुलली, भोळ्याभाबड्या शेतकरणीने चतुरपणाने पाण्याचा थेंब नि थेंब जपला होता.

shaalaa.com
कथालेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: उपयोजित लेखन - कथालेखन [Page 51]

APPEARS IN

Balbharati Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 15 उपयोजित लेखन
कथालेखन | Q कृती | Page 51

RELATED QUESTIONS

खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

गरीब शेतकरी ______ कोरडवाहू जमीन ______ कठोर परिश्रम ______ शेतीत नवनवीन प्रयोग ______ उत्पन्नात भरभराट ______ यशस्विता ______ आनंद ______ इतरांना मार्गदर्शन ______ राष्ट्रीय पुरस्कार ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.


खालील कथालेखन करा.

रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.


खालील कथालेखन करा.

रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

एकीचे बळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

ऐकावे जनाचे करावे मनाचे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कष्टाची गोड फळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

बुद्धी आणि ताकदीचा मेळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

पळसाला पाने तीनच


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

विज्ञानाची कास धरा


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज


खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:

एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.


खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.

मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.) 

तळेगाव गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची थोडीफार शेती होती व शेतीसाठी दोन बैलही त्याच्यापाशी होते. एक ढवळ्या व दुसरा पवळ्या अशी त्यांची नावे होती. त्यांची चांगली मैत्री होती. शेतात काम करायला ते एकत्र जात व एकत्रच परत येत पण एके दिवशी ________

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

आटपाट नगर - वृद्ध शेतकरी - आंब्याची रोपे - बागेत काम - राजा हिंडत बागेत - राजाची चौकशी - रोपे लावून फळे केव्हा - शेतकऱ्याचे उत्तर ऐकून राजाला आश्चर्य - शेतकऱ्याला बक्षीस.


खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहूर तिच्या मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि .....


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×