Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मी अनुभवलेला पाऊस’ या विषयावर निबंध लिहा.
उत्तर
मी अनुभवलेला पाऊस
जून महिना सुरू झाला होता. उन्हाचा त्रास कमी झाला होता. तरीही अजून उकाडा जाणवत होता. शहरातील डांबरी रस्त्यांवरून उष्णतेची तीव्रता जाणवत होती. सर्वांच्या मनाला वेध लागले होते. पावसाचे! माणसांप्रमाणेच पशुपक्षी, झाडे देखील पावसाची आतुरतेने वाट बघत होते.
अचानक एके दिवशी दुपारी अंधार पडला. थंडगार वारा वाहू लागला. बघता बघता झुळूक सोसाट्याच्या वाऱ्यात बदलली. परिसरातील धूळ वाऱ्याबरोबर उडू लागली. आकाशात काळे ढग जमा झाले होते. आम्हाला काही कळायच्या आतच पाऊस जोरात कोसळू लागला. मातीचा गंघ दरवळला. सर्वांच्या ओठांत एकच धून घुमली, “पाऊस आला !' क्षणात वातावरण आनंदून गेले.
थेंबांचा वेग वाढला. सरीवर सरी बरसू लागल्या. ढगांचा गडगडाट झाला आणि विजांचा कडकडाट होऊ लागला. अचानक आलेला पाऊस संध्याकाळ झाली तरी बरसतच होता. कामावरून घरी परतणाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. छत्री व रेनकोट कुणाकडेच नसल्याने काहीजण भिजत भिजत परतत होते. आज पावसाने खोडकर मुलांप्रमाणे सगळ्यांवर चाल खेळली. अंगणात दोरीवरून कपडे उतरवत असताना शेजारच्या काकू पावसाने भिजल्या. तरीही पावसाबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता होती. लहान मुले “पाऊस आला मोठ्ठा ' असं भिजत भिजत म्हणत होती. झाडांच्या पानांवरची धूळ साफ झाली होती. पाने चकाकू लागली होती. धरती न्हाऊन निघाली होती. उन्हामुळे हैराण झालेले सर्व सुखावले होते.
सृष्टीत झालेला हा बदल मला खूप आवडला. पावसाने माझे मन सुखावले. उत्साह जाणवू लागला होता. निसर्गदेखील चेतन्याने फुलून आला होता. संध्याकाळी उशिरा कधीतरी पाऊस थांबला. पावसाने आज नव्या क्रतूची सुरुवात केली होती. असा हा जादुगार पाऊस सर्वांवर आनंदाची बरसात करून गेला होता.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘जल है तो कल है’ विषय पर अस्सी से सौ शब्दों में निबंध लिखिए।
‘मेरा प्रिय वैज्ञानिक’ विषय पर निबंध लेखन कीजिए।
‘मेरा प्रिय कवि/लेखक’ विषय पर सौ शब्दों में निबंध लिखिए।
‘देश की उन्नति में युवाओं का योगदान’ विषय पर अपने विचारों की मौखिक तथा लिखित अभिव्यक्ति कीजिए।
निम्नलिखित विषय पर लगभग ८० से १०० शब्दों में निबंध लिखिए:
मेरा भारत देश
निम्नलिखित विषय पर 200 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए:
प्रातः काल योग करते लोग
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 150 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए।
बारिश की वह सबुह
निम्नलिखित विषय पर 60 - 70 शब्दों में निबंध लिखिए:
मोबाइल की उपयोगिता
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।
जैसे ही मैंने अलमारी खोली
नीचे दिए गए अप्रत्याशित विषय पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।
झरोखे से बाहर
निबंध लिखिए-
यदि इंटरनेट (अंतरजाल) न होता....
निबंध लिखिए -
यदि मैं प्रधानमंत्री होता।
निम्नलिखित विषय पर लगभग 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए।
नालंदा की सैर
निम्नलिखित विषय पर लगभग 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए।
ऑनलाइन या ई-लर्निंग और विद्यार्थी
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए।
एक किसान की आत्मकथा
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए।
मेरा प्रिय खेल
दैनंदिनी (डायरी) तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून तिचे आत्मकथन पुढील मुद्द्यांचा उपयोग करून लिहा.
- निर्मिती
- महत्त्व
- उपयोग
- इतरांची भावना
- आनंद
- खंत
‘करत-करत अभ्यास के जड़मति होत सुजान’ इस विषय पर भाषाई सौंदर्यवाले वाक्यों, सुवचन, दोहे आदि का उपयोग करके निबंध/कहानी लिखिए ।
रामवृक्ष बेनीपुरी द्वारा लिखित ‘गेंहूँ बनाम गुलाब’ निबंध पढ़िए और उसका आकलन कीजिए ।