Advertisements
Advertisements
प्रश्न
डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले?
टिप्पणी लिखिए
उत्तर
इसवी सन १६०२ मध्ये पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या 'युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी'ला डच सरकारने पुढील अधिकार दिले -
(१) पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार कंपनीला देण्यात आला.
(२) कंपनीच्या कामासाठी नोकर भरती करण्याचा अधिकार दिला. या नोकर भरतीत स्थानिक लोकांचीही भरती करण्याची परवानगी होती.
(३) डच सरकारसाठी सर्वत्र वखारी स्थापन करण्याचा अधिकार.
(४) वसाहतींच्या संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचा अधिकार.
(५) स्थापन केलेल्या वसाहतींत आपली नाणी पाडण्याचा अधिकार.
(६) पौर्वात्य देशांशी युद्ध वा तह करण्याचा अधिकार.
या कामांना जबाबदार म्हणून कंपनीने गव्हर्नर जनरल हा अधिकारी नियुक्त केला होता.
shaalaa.com
भारत आणि युरोपीय वसाहतवाद - डच
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?