Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतात पोर्तुगिजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या?
टिप्पणी लिखिए
उत्तर
पोर्तुगिजांनी भारतात पुढील ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या -
(१) पोर्तुगिजांनी प्रथम अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर वर्चस्व निर्माण केले.
(२) आपल्या आरमारी सामर्थ्यावर त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या.
(३) दीव, दमण, चौल, गोवा (साष्टी व बारदेश), वसई येथे मुंबईला लागून वसाहती स्थापन केल्या.
(४) पश्चिम किनारपट्टीवर होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोची आणि कोल्लम या कर्नाटकच्या प्रदेशांत वसाहती उभारल्या.
(५) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिणम, मयिलापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथेही पोर्तुगिजांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या.
shaalaa.com
भारत आणि युरोपीय वसाहतवाद - पोर्तुगीज
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?