Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतीय सत्ताधीशांना कार्ताझ घेणे गरजेचे होते.
टिप्पणी लिखिए
उत्तर
(१) पोर्तुगिजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि हिंदी महासागरावर वर्चस्व प्रस्थापित केले.
(२) भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगिजांचे कार्ताझ म्हणजे परवाना घेणे त्यांनी आवश्यक केले.
(३) परवाना न घेता प्रवास केल्यास पोर्तुगीज ते जहाज जप्त करीत किंवा बुडवत असत.
(४) पोर्तुगिजांचे आरमारी सामर्थ्य मोठे असल्याने आदिलशाही व कुतुबशाही या सत्तांनासुद्धा कार्ताझ घेणे गरजेचे असे. पोर्तुगीज आरमाराचा मुकाबला करणे कोणाही भारतीय सत्तांना शक्य नसल्याने त्यांना कार्ताझ घेणे गरजेचे होते.
shaalaa.com
भारत आणि युरोपीय वसाहतवाद - पोर्तुगीज
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?