Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेच्या कृती सोडवा. गुण (०८)
फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या |
मुद्दे:
१. कवयित्री- (०१)
२. कवितेचा विषय- (०१)
३. कवितेतून मिळणारा संदेश- (०२)
४. कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)
५. ओळींचा सरळ अर्थ लिहा. (०२)
धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू
मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी...
६. शब्दांचे अर्थ लिहा. (०२)
१. दृष्टी
२. हात
३. वृक्ष
४. दौलत
उत्तर
१. कवयित्री अंजली कुलकर्णी
२. कवितेचा विषय- निसर्गाचे आपल्या आयुष्यातील स्थान व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व
३. जागतिकीकरणाच्या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी, मातीशी असलेला आपला जिव्हाळयाचा संबंध तोडू नये, त्यासाठी पर्यावरणाची जोपासना करावी, निसर्गाचे संवर्धन करावे व निसर्गाच्या विलोभनीय साैंदर्याचा आस्वाद घ्यावा असा संदेश 'रंग मजेचे रंग उद्याचे' या कवितेतून मिळतो.
४. या कवितेद्वारे कवयित्री अगदी साध्यासोप्या भाषेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश वाचकांच्या मनात रुजवते. पर्यावरणाची जोपासना कशी करावी यासंबंधीचे उपाय ती कवितेच्या माध्यमातून स्पष्ट करते. ती धरणीला 'काळी आई' म्हणते, पानांच्या सळसळीला 'गर्भरेशमी' असा शब्द वापरते. या छोट्या; पण अर्थपूर्ण शब्दांची गुंफण केल्यामुळे कविता सुंदर झाली आहे. कविता वाचताना उत्साह, सकारात्मकता जाणवते. ही कविता लयबद्ध आहे. त्यामुळे, ती गाताना वेगळाच आनंद मिळतो. म्हणून, मला ही कविता फार आवडते.
५. संगणक धान्य पिकवू शकत नाही, त्यामुळे आपल्याला धान्य पुरवणाऱ्या काळया मातीचे संवर्धन करू. मातीत ज्या शेतकर्यांचे हात राबतात त्यांना अधिक बळकट बनवू.
६.
१. नजर
२. हस्त, कर
३. तरू, झाड
४. संपत्ती
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.
आकृती पूर्ण करा.
वाक्य पूर्ण करा.
जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण-
वाक्य पूर्ण करा.
कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट-
कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
आभाळाचे छत्र-
कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
गर्भरेशमी सळसळ-
कृती पूर्ण करा.
'कष्ट करणाऱ्यांना मदत करू' या आशयाची ओळ शोधा.
पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.
वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)
i. आकृतिबंध पूर्ण करा. गुण(०२)
१.
२.
- गच्च माजतील राने -
- रुजतील देशी झाडे –
फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या |
ii. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
अ. दाट ताटवे कशाचे आहेत?
आ. मने कोणत्या रंगाची असावीत?
iii. कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (०२)
१. सृष्टी -
२. पुष्टी -
३. वृष्टी -
४. तुष्टी -
iv. काव्यसाैंदय
वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी पर्याय सुचवा. (०२)
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘रंग मजेचे रंग उदयाचे’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी। रंग मजेचे, रंग उदयाचे॥’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) ताटवे - |
(ii) माजतील - | |
(iii) आभाळ - | |
(iv) रुजतील - |