Advertisements
Advertisements
प्रश्न
पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.
उत्तर
'रंग मजेचे रंग उद्याचे' या कवितेत कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी आजच्या संगणकयुगातील मानवाने निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा, पर्यावरण संवर्धन करावे असा संदेश दिला आहे. जागतिकीकरणाच्या या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तोडू नये. यासाठी त्याने पर्यावरणाची जोपासना करावी तरच त्याला सुंदरशा निसर्गाचा खराखुरा आस्वाद घेता येईल असा विचार यात व्यक्त होतो.
काळ्या आईची म्हणजेच मातीची सेवा करायला हवी कारण या काळ्या आईच्या पोटातून उगवणाऱ्या अन्नावरच आपले पोषण होते. त्यामुळे, मातीत कष्टणाऱ्या कष्टकरी हातांना आधार देण्याची गरज आहे.
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. निसर्गातील जलचक्र बिघडत आहे. हे रोखण्यासाठी प्रत्येकाने डोंगरउतारावर, मोकळ्या जागी बिया फेकल्या पाहिजेत. पावसाळ्यात या बिया जमिनीत रुजतील, त्यातून झाडे निर्माण होतील. या झाडांमुळे राने वाढतील. परिणामी, पाऊस पुरेसा पडू लागेल. उघडेबोडके डोंगर पुन्हा हिरव्यागार गालिच्याने सजतील. अशा निसर्गसुंदर वातावरणात राहिल्यावर मानवालाही निसर्गाचा खराखुरा आस्वाद घेता येईल आणि पृथ्वीवरील निसर्गसृष्टीचे पर्यायाने येथील पर्यावरणाचे संवर्धन होईल, असे कवयित्रीला वाटते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.
आकृती पूर्ण करा.
वाक्य पूर्ण करा.
जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण-
वाक्य पूर्ण करा.
कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट-
कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
गर्भरेशमी सळसळ-
कृती पूर्ण करा.
‘दौलत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
कृती पूर्ण करा.
'कष्ट करणाऱ्यांना मदत करू' या आशयाची ओळ शोधा.
वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेच्या कृती सोडवा. गुण (०८)
फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या |
मुद्दे:
१. कवयित्री- (०१)
२. कवितेचा विषय- (०१)
३. कवितेतून मिळणारा संदेश- (०२)
४. कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)
५. ओळींचा सरळ अर्थ लिहा. (०२)
धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू
मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी...
६. शब्दांचे अर्थ लिहा. (०२)
१. दृष्टी
२. हात
३. वृक्ष
४. दौलत
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘रंग मजेचे रंग उदयाचे’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी। रंग मजेचे, रंग उदयाचे॥’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) ताटवे - |
(ii) माजतील - | |
(iii) आभाळ - | |
(iv) रुजतील - |