Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
भारतातील पहिले आगळेवेगळे 'पुस्तकांचे गाव' महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरांत पर्यटकांसाठीच पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे-जुने लेखक, संत साहित्य, कथा-कादंबरी, कविता, ललित, चरित्रेआत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही 'वाचन-आनंद' घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या. |
१. भिलारची दोन नैसर्गिक वैशिष्ट्ये कोणती?
२. भिलार प्रकल्पाचे बोधवचन कोणते आहे?
३. भिलार गाव महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीमध्ये कशी भर घालते?
उत्तर
१.
- निसर्गरम्य ठिकाण
- स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव
ही भिलारची दोन नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत.
२. 'आम्हां घरी धन...शब्दांचीच रत्ने' हे भिलार प्रकल्पाचे बोधवचन आहे.
३.
१. भिलार या पुस्तकांच्या गावात अनेक घरांत पर्यटकांसाठी पुस्तके उपलब्ध आहेत. हे या ठिकाणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
२. वाचन चळवळ वाढावी आणि पर्यटकांना मराठी भाषेतील नव्या जुन्या लेखकांच्या साहित्याचा, संत साहित्याचा 'वाचन-आनंद' घेता यावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे.
३. या पुस्तकांच्या गावातील पुस्तकसंग्रहामध्ये कथा-कादंबरी, कविता, ललित, चरित्रेआत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य अशा साहित्य प्रकारांचा समावेश आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
महाबळेश्वरजवळील भिलार हे ______ गाव प्रसिद्ध आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर राेजगार निर्मिती कशी होते?
पुढील संकल्पनाचित्र स्पष्ट करा.
महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटनस्थळे....
पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.
महाबळेश्वरजवळील भिलार हे ______ गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
पर्यटनामुळे त्या ठिकाणाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते?
पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संधीविषयक चर्चा करा.
पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रात इतिहासाच्या विदयार्थ्यांना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत?